शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
4
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
5
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
6
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
7
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
8
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
9
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
10
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
11
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
12
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
13
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
14
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
15
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
16
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
17
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
18
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
19
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
20
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!

Coronavirus: महाराष्ट्रासह यूपी, दिल्लीमध्ये कोरोनाची लाट ओसरली, आता या राज्यांमध्ये वाढतोय धोका, तज्ज्ञांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 18:57 IST

Coronavirus in India: गणितीय आकडेमोडीमधून तज्ज्ञांनी याबाबतची माहिती दिली आहे. SUTRA मॉडेलने पुढील सहा ते आठ महिन्यांदरम्यान देशात कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट येईल, अशी शक्यताही वर्तवली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यातल्यात्यात दिलासादायक बाब म्हणजे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची लाट आता ओसरली आहे. (Coronavirus in India) मात्र अद्यापही अनेक राज्यांम्ये कोरोनाच्या संसर्गाचा पीक येणे बाकी आहे. याबाबत आयआयटीच्या तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.  (Coronavirus wave subsided in Maharashtra, UP, Delhi, now the threat is increasing in Tamil nadu, Punjab, Assam, experts warn)

गणितीय आकडेमोडीमधून तज्ज्ञांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार तामिळनाडू, पंजाब आणि आसाममध्ये कोरोनाच्या संसर्गाने शिखर गाठणे अद्याप बाकी आहे. याबाबतचा अंताज SUTRA मॉडेलच्या माध्यमातून बांधण्यात आला आहे. दरम्यान, SUTRA मॉडेलने पुढील सहा ते आठ महिन्यांदरम्यान देशात कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट येईल, अशी शक्यताही वर्तवली आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनीही कोरोनाच्या येणाऱ्या पीकबाबत अंदाज वर्तवला आहे.  

या गणितीय मॉडेलच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, दिल्ली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाच्या लाटेचा जोर ओसरला आहे. मात्र तामिळनाडू, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि आसाममध्ये कोरोनाच्या लाटेने शिखर गाठणे अद्याप बाकी आहे. या मॉडेमधील अंदाजानुसार तामिळनाडूमधील कोरोनाच्या संसर्गाचा पीक २९ ते ३१ मेच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. तर पुदुच्चेरीमध्ये १९ ते २० मे दरम्यान पीक येईल. तर आसाममध्ये २० ते २१ मे दरम्यान कोरोनाचा पीक येण्याची शक्यता आहे.  

उत्तरेकडील राज्यांचा विचार केल्यास हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. पंजाबमध्ये २२ मे आणि हिमाचल प्रदेशमध्ये २४ मेपासून कोरोनाचा पीक दिसून येईल.  

मात्र महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि गोवा या राज्यांमध्ये कोरोनाची लाट ओसरली आहे. येथील रुग्णसंख्येत सातत्याने घट दिसून येत आहे.    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस