शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

Coronavirus: ...ही तर भारतासाठी एक संधीच, मोदी सरकारला राहुल गांधींनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 1:13 PM

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच अमेठीतल्या गरजू लोकांच्या मदतीसाठी पाच ट्रक तांदूळ, पाच ट्रक पीठ, गहू आणि एक ट्रक डाळ गरजू लोकांना पाठवले होते.

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात दिवसागणिक वाढतच चालला आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या देशात 14,000 पेक्षा जास्त झाली आहे. सरकारकडून  उपाययोजना राबवल्या जात असतानाच इतर राजकीय नेतेसुद्धा मदतीसाठी पुढे आल्याचं पाहायला मिळतं आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच अमेठीतल्या गरजू लोकांच्या मदतीसाठी पाच ट्रक तांदूळ, पाच ट्रक पीठ, गहू आणि एक ट्रक डाळ गरजू लोकांना पाठवले होते.अमेठी जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते अनिल सिंह म्हणाले की, अमेठीमध्ये कुणीही उपाशी राहणार नाही. प्रत्येक गरजूंपर्यंत मदत साहित्य पुरवले जाणार आहे.  लोकसभा मतदारसंघातील 877 ग्रामपंचायती आणि नगर पंचायत / नगरपालिकांमध्ये राहुल गांधी यांच्या मार्फत 16,400 रेशन किट्सचं वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी ट्विट केले असून, कोरोना हे एक मोठे आव्हान तर आहेच, पण त्याचबरोबर संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ट्विट करत ते लिहितात, कोरोनासारखी जागतिक महामारी हे एक मोठं आव्हान आहे, परंतु ही तर एक संधी आहे. संकटाच्या काळात आवश्यक असलेल्या नावीन्यपूर्ण उपायांवर काम करण्यासाठी आपल्या वैज्ञानिक, अभियंता आणि डेटा तज्ज्ञांच्या विशाल समुदाय वाढवण्याची आवश्यकता आहे. शनिवारी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरस संक्रमणाची संख्या वाढून 14,378 झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासात कोरोनाची 991 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या