शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

coronavirus: त्यामुळे भारतात वेगाने होतोय कोरोनाचा फैलाव, तज्ज्ञांनी सांगितली ही चार कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:27 PM

Coronavirus in India : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. आता एप्रिल महिन्याच्या अखेरीस देशात कोरोना संसर्गाची सर्वोच्च पातळी गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने भारतात सध्या धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी कोरोना विषाणूचा भारतात प्रचंड वेगाने फैलाव होत आहे. (Coronavirus in India) गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १ लाख ६१ हजार रुग्ण सापडले आहेत. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी जानेवारीमध्ये देशातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमालीचा मंदावला होता. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. आता एप्रिल महिन्याच्या अखेरीस देशात कोरोना संसर्गाची सर्वोच्च पातळी गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतात कोरोनाचा फैलाव नेमका का वेगाने होतोय. याबाबत तज्ज्ञांनी चार कारणे सांगितली आहेत. ती कारणे पुढील प्रमाणे आहेत. (Coronavirus is spreading rapidly in India, Experts state four reasons)

 कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंटयावेळी दोन प्रकराच्या विषाणूंनी लोकांना त्रस्त केले आहे. यातील एक देशी आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक विदेशी विषाणू आहेत. आतापर्यंत ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका व न्यूयॉर्क मध्ये सापडलेले व्हेरिएंट भारतातही सापडले आहेत. मार्चच्या अखेरीस भारतातील नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने एका नव्या व्हेरिएंट डबल म्युटेंटची माहिती दिली होती. महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाबमधून घेण्यात आलेल्या सॅम्पलमधून एका व्हेरिएंटची ओळख पटली आहे. व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमिल यांनी पीटीआयला सांगितले की, नव्या डबल म्युटेंटमुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार १५-२० टक्के केस नव्या व्हेरिएंटचे आहेत. ब्रिटनमधील नवा कोरोना व्हेरिएंट आधीच्या तुलनेत ५० टक्के वेगाने पसरतो.  

कोरोना प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष यावर्षी जानेवारी महिन्यात कोरोनाचा वेग कमी झाल्यानंतर लोक कमालीचे बेफिकीर झाले. सरकारने कोरोनाचे नियम पाळण्याचे लोकांना सातत्याने आवाहन केले. जमील यांच्या म्हणण्यानुसार भारतात सारे काही खुले आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र राज्य सरकारे आता हळुहळू विविध प्रकारचे निर्बंध लागू करत आहेत. 

लसीकरणाची गती देशभरात जानेवारी महिन्यात लसीकरणाल सुरुवात झाली. मात्र अनेक लोक कोरोनावरील लस घेण्याचे टाळत होते. जमील यांनी सांगितले की, हेल्थ वर्कर्ससुद्धा लस घेण्याचे टाळत होते. त्याशिवाय मार्च महिन्यात जेव्हा ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचे लसीकरण सुरू झाले तेव्हासुद्धा लोक लसीकरण केंद्रांवर येत नव्हते. आतापर्यंत केवळ ७ टक्के लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर केवळ ५ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. लोकांमधील अँटिबॉडी संपुष्टात येतेय याशिवाय इंस्टिट्युट ऑफ जिनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉलीच्या एका नुकत्याच झालेल्या संशोधनामधून कोरोनामुळे संसर्ग झालेल्या २० टक्क्यांपासून ३० टक्क्यांपर्यंतच्या लोकांमध्ये सहा महिन्यांनंतर अँटिबॉडी संपुष्टात येत आहेत. त्यामुळेच लोकांना संसर्ग होत आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) कानपूरमध्ये तज्ज्ञांच्या मते कोरोनाची दुसरी लाट एप्रिलच्या मध्यावर शिखर गाठू शकते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य