शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : फ्रान्सहून परतल्यानंतर होता क्वारंटाइनवर अन् हजारो पाहुण्यांना बोलावून चढला बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 10:02 IST

या क्वारंटाइनवर ठेवण्यात आलेल्या व्यक्तीच्या लग्नात हजारो लोक सहभागी झाल्यानं एकच खळबळ उडाली.

हैदराबादः कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक जण अद्यापही या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निष्काळजीपणा करत असल्याचं समोर आलं आहे. तेलंगणातही असंच एक प्रकरण समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच फ्रान्सवरून एक व्यक्ती भारतात परतला होता. प्रशासनानं त्याला दोन आठवडे घरात नजरकैद होण्यास सांगितलं होतं. परंतु त्यानं क्वारंटाइनची चिंता न करता हजारोंच्या उपस्थितीत लग्न केलं. या क्वारंटाइनवर ठेवण्यात आलेल्या व्यक्तीच्या लग्नात हजारो लोक सहभागी झाल्यानं एकच खळबळ उडाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा लग्न सोहळा गुरुवारी पार पडला आहे. लग्नासाठी तो हैदराबादहून दीड किलोमीटर दूर असलेल्या हनामकोंडा येथे आला होता. राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी लग्नसोहळ्यात फक्त 200 लोकांना आमंत्रित करण्याचं आवाहन केलं आहे. पण तरीही या व्यक्तीनं लग्नात हजारांहून अधिक लोकांना निमंत्रण दिलं. त्या व्यक्तीचा नातेवाईक हा मंत्री असल्याचं सांगितलं जातं आहे. लग्नानंतर थाटामाटात रिसेप्शन करायचाही प्लॅन होता. पण सीएमओ ऑफिसला याची माहिती मिळाल्यानंतर हे रिसेप्शन लागलीच रद्द करण्यात आलं. या लग्नात आता कोण कोण सहभागी झाले होते, याचा प्रशासन शोध घेत आहे. सर्वच पाहुण्यांवर नजर ठेवली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही व्यक्ती 12 मार्चला फ्रान्सवरून परतली होती.  

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसचा कहर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या  2,69,911 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 184 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 11,267 वर पोहोचली आहे. भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 236 वर पोहोचली आहे. त्यात 32 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यामध्ये इटलीचे 17, फिलिपिन्सचे 2, ब्रिटनचे 2, कॅनडा, इंडोनेशिया, सिंगापूरच्या प्रत्येकी एका नागरिकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?

‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या