शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

coronavirus: संरक्षण मंत्रालयामध्येही कोरोनाचा शिरकाव? संरक्षण सचिवांमध्ये दिसली लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 12:19 PM

महत्त्वाच्या सरकारी कार्यालयामध्येही कोरोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यामध्ये  काल कोविड-१९ ची लक्षणे दिसून आली आहेत.

ठळक मुद्देसंरक्षण सचिवांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही याबाबत संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संरक्षण सचिव अजय कुमार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती लष्करातील दोन अधिकाऱ्यांनी दिली आहे.त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचा व्यापक प्रमाणात शोध घेण्यात आला असून सुमारे ३५ अधिकाऱ्यांना होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असताना आता महत्त्वाच्या सरकारी कार्यालयामध्येही कोरोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यामध्ये  काल कोविड-१९ ची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचा व्यापक प्रमाणात शोध घेण्यात आला असून सुमारे ३५ अधिकाऱ्यांना होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, संरक्षण सचिवांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही याबाबत संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र संरक्षण सचिव अजय कुमार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती लष्करातील दोन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्रालयात आलेले नाहीत. 

संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, लष्करप्रमुख आणि नौदलप्रमुखांची कार्यालये साऊथ ब्लॉकमधील पहिल्या मजल्यावर आहेत. दुसरीकडे राज्यसभा आणि लोकसभा सचिवालयातील तीन अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या संपर्कातील अन्य कर्मचाऱ्यांना होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कार्यालयांना सँनिटाईझ करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDefenceसंरक्षण विभागNew Delhiनवी दिल्लीIndiaभारत