शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: सलाम डॉक्टर...पाच दिवस रुग्णसेवा, घराच्या दारातच घेतला चहा अन् पुन्हा 'मिशन कोरोना'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 17:12 IST

कोरोनाग्रस्त रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टर कसोशीनं प्रयत्न करत आहेत. अशातच २४-२४ तासही डॉक्टर सेवा बजावत आहेत. डॉक्टरांना वाढत्या रुग्णांमुळे घरी जाणंही शक्य होत नाही. 

ठळक मुद्देदेशात लॉकडाऊन करण्यात आलं असून, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणाही कमालीची कामाला लागली आहे. अनेकदा रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना कोरोना झाल्याचंही निष्पन्न झालं आहे, तर काही डॉक्टरांना कर्तव्यापायी घराकडेही फिरकता येत नाही. अशातच २४-२४ तासही डॉक्टर सेवा बजावत आहेत. डॉक्टरांना वाढत्या रुग्णांमुळे घरी जाणंही शक्य होत नाही. 

भोपाळ- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. देशात लॉकडाऊन करण्यात आलं असून, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणाही कमालीची कामाला लागली आहे. अनेकदा रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना कोरोना झाल्याचंही निष्पन्न झालं आहे, तर काही डॉक्टरांना कर्तव्यापायी घराकडेही फिरकता येत नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टर कसोशीनं प्रयत्न करत आहेत. अशातच २४-२४ तासही डॉक्टर सेवा बजावत आहेत. डॉक्टरांना वाढत्या रुग्णांमुळे घरी जाणंही शक्य होत नाही. 

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये अशाच एका डॉक्टरनं कर्तव्याचं मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवून आदर्श निर्माण केला आहे. भोपाळचे सीएमएचओ डॉ. सुधीर डेहरिया दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. सीएमएचओ डॉ. सुधीर डेहरिया सोमवारी पाच दिवसांनंतर आपल्या घरी पोहोचले. परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सतर्कताही बाळगली. घरात प्रवेश न करताच ते घराबाहेरच बसून राहिले. घराच्या बाहेर बसूनच चहा प्यायले आणि तिथूनच घरच्यांची विचारपूस केली. त्यानंतर पुन्हा कर्तव्य बजावण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. घराच्या बाहेर बसून चहा पितानाचा या डॉक्टरचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीसुद्धा ट्विटर हँडलवरून डॉ. डेहरिया यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ट्विटरवर लिहितात, डॉ. सुधीर डेहरिया यांना भेटा, जे भोपाळ जिल्ह्याचे सीएमएचओ आहेत. सोमवारी ते पाच दिवसांनी घरी पोहोचले, घराबाहेर बसले आणि चहा प्यायला, घराच्या बाहेरूनच कुटुंबाची विचारपूस केली आणि बाहेरच्या बाहेरूनच रुग्णालयात परतले. डॉक्टर देहरिया आणि यांसारख्या हजारो कोरोना वॅरियर्सना मी समाल करतो. आम्हाला तुमचा अभिमान आहे. दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली असून, भारतात 1251 एवढे रुग्ण आहेत. त्याचवेळी मध्य प्रदेशात 47 रुग्ण आढळले आहेत. कोरोनानं आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान