CoronaVirus : डेल्टा व्हेरिएंट अँटीबॉडीला देतोय चकमा, एका व्यक्तीला 30 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 03:53 PM2021-06-19T15:53:52+5:302021-06-19T15:59:46+5:30

CoronaVirus : 30 दिवसानंतर पुन्हा एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे स्वत: डॉक्टरही आश्चर्यचकित असून अखेर असे कसे घडले, याविषयी गुजरातमधील वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे.

CoronaVirus: corona virus delta variant evaded covid antibody gained claims study | CoronaVirus : डेल्टा व्हेरिएंट अँटीबॉडीला देतोय चकमा, एका व्यक्तीला 30 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लागण

CoronaVirus : डेल्टा व्हेरिएंट अँटीबॉडीला देतोय चकमा, एका व्यक्तीला 30 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लागण

Next

अहमदाबाद : सहसा एकदा कोरोना झाल्यानंतर कोणालाही जवळपास तीन महिन्यांपर्यंत पुन्हा संक्रमण होत नाही. डॉक्टरांच्या मते, कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांमध्ये व्हायरससोबत लढण्यासाठी शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. मात्र, अहमदाबादहून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. 30 दिवसानंतर पुन्हा एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे स्वत: डॉक्टरही आश्चर्यचकित असून अखेर असे कसे घडले, याविषयी गुजरातमधील वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. 

अहमदाबादमध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून काम करणारे राजेश भट्ट यांना कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान संसर्ग झाला. त्याची प्रकृती गंभीर नव्हती. त्यामुळे ते घरीच क्वारंटाईन राहिले आणि कोरोनातून बरे झाले. मात्र, केवळ महिनाभरानंतरच कोरोना व्हायरसने त्याच्यावर पुन्हा हल्ला केला. यावेळी कोरोनाचा परिणाम त्यांच्या शरीरावर पूर्वीपेक्षा अधिक त्रासदायक होता. राजेश भट्ट यांना 13 दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. आता ते ठीक आहेत. पण या प्रकरणाने अहमदाबादमधील लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

सहसा जरी एखाद्याला कोरोनाचा पुन्हा संक्रमण झाला असेल तर ते अगदी सौम्य असतो आणि रुग्णास रुग्णालयात जाण्याची गरज नसते. पण राजेश भट्ट यांचे प्रकरण पूर्णपणे वेगळे आहे. पहिल्यांदा संसर्ग सौम्य होता आणि दुसऱ्यांदा खूप तीव्र होता. त्यामुळे हे प्रकरण डोळ्यासमोर ठेवून गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये अभ्यास करण्यात आला.


दरम्यान, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान B.1.617.2 व्हेरिएंटने हाहाकार माजला. आता याला डेल्टा म्हणून ओळखले जाते. संशोधनातून असे दिसून आले की, या व्हेरिएंटने त्याचे स्वरूप बदलले आहे. यामधून दोन अमीनो अ‍ॅसिड गायब झाले होते. त्यामुळे व्हेरिएंटमध्ये बदल झाल्यामुळे ते अँटीबॉडीला चकमा देण्यात यशस्वी झाला. आता शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की, व्हायरसचे बदलते रुप शोधण्यासाठी जास्तीत जास्त जीनोम सीक्वेन्सिंग करणे आवश्यक आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus: corona virus delta variant evaded covid antibody gained claims study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app