शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

coronavirus: कोरोनाच्या लसीकरणासाठी भारताला येईल ५० हजार कोटी रुपये खर्च, एका लसीची असेल एवढी किंमत

By बाळकृष्ण परब | Published: October 22, 2020 5:59 PM

India Corona vaccine News : चीननंतर जगातील सर्वाधिक कोलसंख्या असलेला दुसरा देश असलेल्या भारताला कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी तब्बल ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे.

ठळक मुद्देभारताला कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी तब्बल ५० हजार कोटींचा खर्च येणार भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोरोनाविरोधातील लस देण्यासाठी सुमारे सहा ते सात डॉलर (४५० ते ५०० रुपये) खर्च येणार या लसीकरणासाठी पुढे कुठल्याही प्रकारची आर्थिक कमतरता भासणार नाही

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांत देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने घटत आहे. एकीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच केंद्र सरकारने कोरोनावरील लस खरेदी करण्यासाठीची तयारी पूर्णत्वास नेण्यास सुरुवात केली आहे. अद्याप कोरोनावरील लस विकसित झाली नसली तरी लवकरच अशी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही तरतूद करण्यात येत आहे. दरम्यान, चीननंतर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसरा देश असलेल्या भारताला कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी तब्बल ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे.विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोरोनाविरोधातील लस देण्यासाठी सुमारे सहा ते सात डॉलर (४५० ते ५०० रुपये) खर्च येणार आहे. असा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील प्रशासनाचा अंदाज आहे. ३१ मार्चला संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत पैसा जमा करण्यात आला आहे. तसेच या लसीकरणासाठी पुढे कुठल्याही प्रकारची आर्थिक कमतरता भासणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार भारतात प्रत्येक व्यक्तील दोन लसी दिल्या जातील. ज्याचा एक वेळचा खर्च हा २ डॉलर एवढा असेल. तसेच २ ते ३ डॉलर प्रतिव्यक्ती खर्च हा साठवण आणि वाहतुकीवर होणार आहे.सरकारी पॅनेलच्या म्हणण्यानुसार सध्या भारतात कोरोनाचा संसर्ग हा शिखरावर पोहोचला आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्याचा फैलाव होऊ शकतो. कोरोनाने देशाच्या आर्थिक विकासाला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, या आठवड्यापासून पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत देशात विविध सणांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वेगाने वाढ होऊ शकते.दरम्यान, मंगळवारी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते की, लॉकडाऊन हटवण्यात आले असले तरी देशातील कोरोना गेलेला नाही. त्यामुळे लस विकसित होईपर्यंत जनतेने नियमांचे पालन करावे. तसेच लस विकसित झाल्यानंतर ही लस सर्व देशवासियांना मिळावी यासाठी सरकारकडून धोरण आखण्यात येणार असल्याचेही मोदींनी सांगितले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य