Coronavirus: केंद्रीय सुरक्षा दलांच्या ४०० जवानांना कोरोना; अधिकारी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 11:52 PM2020-05-06T23:52:47+5:302020-05-06T23:53:03+5:30

उपाययोजना कटाक्षाने पाळण्याचे आवाहन

Coronavirus: Corona kills 400 Central Security Forces personnel; Officers worried | Coronavirus: केंद्रीय सुरक्षा दलांच्या ४०० जवानांना कोरोना; अधिकारी चिंतेत

Coronavirus: केंद्रीय सुरक्षा दलांच्या ४०० जवानांना कोरोना; अधिकारी चिंतेत

Next

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणखी ८५ जवानांना बुधवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याने केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दलांमधील या साथीचा संसर्ग झालेल्यांची संख्या ४०० च्या घरात पोहोचली आहे. देशाच्या सीमांवर सुरक्षेची अत्यंत महत्त्वाची कामगिरी पार पाडत असलेले हे जवान एवढ्या मोठ्या संख्येने या महामारीच्या कचाट्यात सापडत असल्याने या सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी चिंतित असून, त्यांनी आपल्या सर्व छावण्या तसेच आस्थापनांमध्ये कोरोनाविरोधी उपाय कसोशीने पाळण्याचे निर्देश पुन्हा एकदा जारी केले आहेत.

सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्याला तुरूंगवास
सिंगापूर : कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सोशल डिन्सन्सिंगचे पालन करा, असे सांगणाºया पोलीस अधिकाºयाला असभ्य भाषेत बोलणाºया भारतीय वंशाच्या रवी सिनाथंबी सुब्रमण्यम (५३) याला बुधवारी सात महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली. सुब्रमण्यम हा अनेक दशकांपासून अनेक गुन्ह्यांत गुंतलेला असल्यामुळे समाजाला सततचा उपद्रव आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. गेल्या महिन्यात त्याने दोन वेळा गुन्हा केला, असे ‘न्यूज एशिया’ने म्हटले. पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांना त्याने शिव्या दिल्याचे त्याच्यावर दोन आरोप होते व तिसरा आरोप त्याने तीन आरोग्य अधिकाºयांचे तोंड फोडण्याची धमकी दिल्याचा होता.

१३८ ‘बीएसएफ’च्या त्रिपुरात अंबासा येथे तैनात असलेल्या १३८ व्या बटालियनमध्ये सर्वात जास्त म्हणजे ४७ जवानांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

‘बीएसएफ’मधील या ताज्या ८५ केसखेरीज मंगळवार संध्याकाळपर्यंत ‘बीएसएप’मध्ये १५० हून अधिक, केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) १४७, भारत तिबेट सीमा पोलीस दलात ४५, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १५, तर सशस्त्र सीमा दलात १३ जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त होते.

Web Title: Coronavirus: Corona kills 400 Central Security Forces personnel; Officers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.