Coronavirus: AMUमधील कोरोनाबळी प्रकरण; तपास अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:28 PM2021-05-17T16:28:47+5:302021-05-17T16:30:44+5:30

Corona death case in AMU: कोरोनाबळींबाबतचा तपास अहवाल समोर आला असून, या अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Coronavirus: Corona death case in AMU; Shocking information came out from the investigation report | Coronavirus: AMUमधील कोरोनाबळी प्रकरण; तपास अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Coronavirus: AMUमधील कोरोनाबळी प्रकरण; तपास अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Next
ठळक मुद्देएएमयूमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा वाढवून सांगण्यात आला मृत्यूंबाबत तिथून येत असलेल्या बातम्या भ्रामक होत्याकाही दिवसांपूर्वी अलिगड मुस्लिम विद्यापीठामध्ये कोरोनाचा फैलाव झाल्याचे वृत्त आल्यानंतर खळबळ उडाली होती

लखनौ - उत्तर प्रदेशमधील अलिगड मुस्लिम विद्यापीठामध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे वृत्त आल्याने शैक्षणिक क्षेत्रासोबतच देशपातळीवर खळबळ उडाली होती. दरम्यान, या कोरोनाबळींबाबतचा तपास अहवाल समोर आला असून, या अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एएमयूमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा वाढवून सांगण्यात आला. तसेच मृत्यूंबाबत तिथून येत असलेल्या बातम्या भ्रामक होत्या, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. (Coronavirus death case in AMU; Shocking information came out from the investigation report)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एएमयूमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबतचा अहवाल थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. पंतप्रधानांना दिलेला अहवाल आणि तिथे झालेल्या तपासणीनंतर वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेला मृत्यूंचा आकडा खरा नसल्याचे निष्पन्न झाले. 

याबाबत तयार केलेल्या तपासणी अहवालामधून समोर आले की,  तिथे मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या नावांचाही समावेश करण्यात आला होता. यामधील अनेकजण अलीगडमध्ये राहत नव्हते. तसेच या मृत्यूंपैकी अनेकांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने आणि स्ट्रोकमुळे झाला होता. एकुण मृत्यूंपैकी १६ जणांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू हा जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये झाला. तर एएमयूमध्ये ३ आणि शहरातील खासगी रुग्णालयात आणि चार जणांचा मृत्यू हा शहराबाहेर झाला होता. 

काही दिवसांपूर्वी अलिगड मुस्लिम विद्यापीठामध्ये कोरोनाचा फैलाव झाल्याचे वृत्त आल्यानंतर खळबळ उडाली होती. या वृत्ताची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत विद्यापिठाच्या कुलगुरूंशी चर्चा केली होती. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर विद्यापीठाच्या आवारात आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली होती.

Web Title: Coronavirus: Corona death case in AMU; Shocking information came out from the investigation report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.