शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

CoronaVirus: कोरोना महामारीचा फटका; चार धाम यात्रा रद्द, 14 मेरोजी होणार होती सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 12:53 IST

मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत म्हणाले, कोरोना काळात यात्रा शक्य नाही. 14 मेरोजी यमुनोत्री मंदिराची कपाटं उघडल्यानंतर ही यात्रा सुरू होणार होती.

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रा (Char dham yatra) रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा 14 मेरोजी सुरू होणार होती. यात्रा रद्द करण्यासंदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी माहिती दिली. यात्रा रद्द करण्यासंदर्भात रावत म्हणाले, राज्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे यात्रा स्थगित करण्यात येत आहे. केवळ पुजाऱ्यांनाच तेथे पुजा करण्याची परवानगी असेल. संपूर्ण देशातील लोकांसाठी चारधाम यात्रा सध्यासाठी रद्द करण्यात येत आहे. (CoronaVirus Char dham yatra cancelled due to Covid-19)

'कोरोना काळात शक्य नाही' -मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत म्हणाले, कोरोना काळात यात्रा शक्य नाही. 14 मेरोजी यमुनोत्री मंदिराची कपाटं उघडल्यानंतर ही यात्रा सुरू होणार होती. उत्‍तराखंड सरकारने गेल्या वर्षीही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा रद्द केली होती. यानंतर राज्य सरकारने एक जुलैपासून श्रद्धाळूंसाठी चारधाम यात्रा सुरू केली होती. तसेच जुलै महिन्याच्या अखेरीस इतर राज्यांतून येणाऱ्या भाविकांनाही सरकारने काही अटींसह परवानगी दिली होती.

CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे रुग्ण -देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 2,69,507 बरे झाले आहेत. काल देशात 3,60,960 कोरोनाबाधित सापडले होते. आज यात जवळपास 18 हजारांनी वाढ झाली आहे. तर मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाने 3645 जणांचा बळी घेतला आहे. काल मृतांचा आकडा 3293 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 350 मृतांची वाढ झाली आहे. आता, देशात एकूण मृतांचा आकडा 2,04,832 झाला असून सध्या 30,84,814 रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर एकूण 1,83,76,524 रुग्ण सापडले असून यापैकी 1,50,86,878  रुग्ण बरे झाले आहेत. लसीकरणाचा आकडा 15,00,20,648 वर गेला आहे. 

CoronaVirus: भाजप तयार करतेय जम्बो आयसोलेशन सेंटर, मिळणार मोफत उपचार; दाखवलं जाणार रामायण अन् बरंच काही

रशियानं पाठवली मदतीची दोन विमानं -देशात नव्या कोरोना बाधितांची आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. अशा या संकट काळात, जगभरात भारताचा जिगरी मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाने भारताच्या मदतीसाठी दोन विमानं पाठवली आहेत. ही दोन्ही विमानं दिल्ली एअरपोर्टवर उतरली आहेत. रशियाने या दोन्ही विमानांत कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन, 75 व्हेंटिलेटर, 150 बेड साइड मॉनिटर आणि फॅबिपिराविर ऑषध पाठवले आहे.

हात जोडून सांगत आहोत, लॉकडाउन लावा... -उत्तर प्रदेशातील कोरोना स्थितीवरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी आदित्यनाथ सरकारला फटकारले आहे. यावेळी, यूपी पंचायत निवडणुकीत कोरोना गाइडलाइनचे पालन का केले गेले नाही? असा सवालही न्यायालयाने केला आहे. याच बरोबर, न्यायालयाने योगी सरकारला 'हात जोडून', राज्यातील मोठ्या शहरांत 14 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन लावण्यात यावा, असा सल्लाही पुन्हा एकदा दिला आहे. यापूर्वीही उच्च न्यायालयाने राज्यातील पाच मोठ्या शहरांत संपूर्ण लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला होता.

CoronaVirus : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह, एक दिवस आधीच पत्नीही झालीय संक्रमित

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश