CoronaVirus News: माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय; यशाची १००% खात्री; रामदेव बाबांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 20:17 IST2020-06-10T20:15:56+5:302020-06-10T20:17:07+5:30
कोरोना रुग्ण बरं होण्याची १०० टक्के खात्री, मृत्यूदर शून्य टक्के; रामदेव बाबांचा दावा

CoronaVirus News: माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय; यशाची १००% खात्री; रामदेव बाबांचा दावा
मुंबई: जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून अनेक कंपन्या त्यावरील लस शोधत आहेत. त्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये कोरोनावरील लसींच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. पुढील महिन्यात चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू असून ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत या प्रयोगांचं यशापयश समोर येईल. त्यामुळे सध्या आधीपासून वापरात असलेल्या औषधांचा वापर करून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय आहे. माझ्याकडे असलेलं औषध १०० टक्के गुणकारी असल्याचा दावा पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांनी केला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. गिलॉय आणि अश्वगंधाच्या मदतीनं कोरोनावर खात्रीनं उपचार होऊ शकतो, असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. 'कोरोना विषाणू शरीरात शिरताच तो आतील यंत्रणेला त्रास देतो. विषाणूचा गुणाकार होतो आणि तो जास्तीत जास्त पेशींना संक्रमित करतो. ही साखळी तोडण्याचं काम गिलॉय वनौषधी १०० टक्के करू शकते,' असं रामदेव बाबा म्हणाले.
कोरोना रुग्णांना गिलॉय आणि अश्वगंधा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 'गिलॉय आणि अश्वगंधा देण्यात आलेल्या रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण १०० टक्के आहे. तर मृत्यूदर शून्य टक्के आहे,' असं रामदेव बाबा म्हणाले. याविषयी पतंजलीमध्ये वैज्ञानिक संशोधन सुरू असून लवकरच ते जगासमोर येईल, असंही त्यांनी सांगितलं. 'जीवघेण्या कोरोना विषाणूचा सामना करण्याची क्षमता आयुर्वेदात आहे. आयुर्वेद केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करत नाही, तर तो विषाणूच्या मुळावरच घाव घालतो,' असं रामदेव यांनी सांगितलं.
...तर पुन्हा कठोर लॉकडाऊन; 'पुनश्च हरीओम'चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा
कोकणात चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना दिलासा, अजित पवारांनी केल्या मोठ्या घोषणा
अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबाः देवेंद्र फडणवीस
‘या’ तारखेपासून राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार; सूत्रांची माहिती