शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Coronavirus: काकाच्या निधनानंतर समर्थकांना घरीच बसण्याचे आवाहन, अब्दुल्लांच्या कृतीने मोदी भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 4:33 PM

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे काका आणि फारुक अब्दुल्ला यांचे बंधु मोहम्मद अली मट्टू यांचे रविवारी निधन झाले. मट्टू यांच्या

श्रीनगर -चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यानंतर हळूहळू कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, देशातील सर्वच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येते. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह देशातील दिग्गज राजकीय नेत्यांनाही या परिस्थितीला कठीण प्रसंगातून सामोरे जावे लागत आहे. 

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे काका आणि फारुक अब्दुल्ला यांचे बंधु मोहम्मद अली मट्टू यांचे रविवारी निधन झाले. मट्टू यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर, ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन आणि प्रसिद्धी माध्यमांतून त्यांच्या समर्थकांना घरीच राहण्याचे आवाहन केलंय. सध्या देशात कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं असून नागरिकांनी आपल्या घराकडे न येता, स्वत:च्या घरी राहूनच त्यांच्या काकांप्रती श्रद्धांजली अर्पित करावी, असे आवाहन ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. 

ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या काकाच्या निधनाची माहिती दिली. माझे काका मोहम्मद अली मट्टू यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले, या कठिण प्रसंगातीही लोकांनी आपल्या घरीच थांबावे, सरकारी नियमांचे पालन करावे, आपण घरातून श्रद्धांजली अर्पण केल्यासही त्यांच्या आत्म्यास शांती लाभेल, असे भावनिक ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले होते. अब्दुल्ला यांच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिट्विट करत संवेदना व्यक्त केल्या. 

ओमर अब्दुल्ला यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर त्यांच्या काकांच्या आत्म्यास शांती देवो, या कठिणप्रसंगातही आपण, नागरिकांना गर्दी न करण्याचा दिलेला संदेश स्वागतार्ह आहे. देशातील कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळकट करण्याचं काम या संदेशातून होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. 

दरम्यान, सध्या ओमर अब्दुल्ला यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत घरात लॉकडाऊन असलेल्या नागरिकांना ट्विटरवरुन सूचना आणि जनजागृती करण्याचं काम हाती घेतलं आहे. आपण, बंदीवासात असताना कशाप्रकारे आपला वेळ घालवत होतो, हा अनुभवही ट्विटरच्या माध्यमातून ओमर अब्दुल्ला सांगत आहेत.    

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याJammu Kashmirजम्मू-काश्मीर