शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: प्रवासी, मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीबाबत केंद्राचा मोठा निर्णय, अंमलबजावणीसाठी राज्यांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 19:18 IST

देशातील लॉकडाऊन संपून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय प्रवासी आणि मालवाहतुकीबाबत निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला.

ठळक मुद्देएका राज्यामधून दुसऱ्या राज्यात होणारी प्रवाशांची ये जा आणि मालाची वाहतूक यांच्यावर आता कुठलीही बंधने घालण्यात येऊ नयेतशेजारील देशांशी झालेल्या करारांतर्गत सीमेपलीकडील व्यापारासाठी व्यक्ती आणि सामानाच्या वाहतुकीसाठी वेगळी परवानगीअसे निर्बंध हे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींअंतर्गत गृहमंत्रालयाने केलेल्या सूचनांचे उल्लंघन ठरेल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठी सध्या देशामध्ये विविध प्रतिबंध लागू करण्यात आलेले आहे. देशातील लॉकडाऊन संपून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय प्रवासी आणि मालवाहतुकीबाबत निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना पत्र लिहिले आहे.देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये देण्यात येत असलेल्या सवलतीच्यादरम्यान राज्यांतर्गत आणि एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात होणारी प्रवाशांची ये जा आणि मालाची वाहतूक यांच्यावर आता कुठलीही बंधने घालण्यात येऊ नयेत, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.या पत्रात अजय भल्ला लिहितात की, विविध जिल्हे आणि राज्यांकडून स्थानित पातळीवर दळणवळणावर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. अशा बंधनांमुळे माल आणि सेवांच्या आंतरराज्यीय दळणवळणामध्ये अडथळे येत आहेत. तसेच यामुळे पुरवठ्याच्या साखळीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. अनलॉकच्या नियमावलीमध्ये व्यक्ती आणि मालाच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर कुठलाही निर्बंध लागू करू नयेत, असे स्पष्ट केलेले आहे. तसेच शेजारील देशांशी झालेल्या करारांतर्गत सीमेपलीकडील व्यापारासाठी व्यक्ती आणि सामानाच्या वाहतुकीसाठी वेगळी परवानगी, मान्यता किंवा ई परमिटची आवश्यकता भासणार नाही.असे निर्बंध हे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींअंतर्गत गृहमंत्रालयाने केलेल्या सूचनांचे उल्लंघन ठरेल. तसेच प्रवासी आणि माला्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येऊ नये, तसेच अनलॉकसंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले गेले पाहिजे, असे गृहसचिवांनी या निर्देशात म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोी यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर हे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने ३१ मेपर्यंत वाढले होते. मात्र १ जूनपासून देशातील लॉकडाऊन मर्यादित करून मिशन अनलॉकची सुरुवात करण्यात आली होती.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार