शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: बीसीजी लसीमुळे वृद्धांचा कोरोनापासून बचाव, आयसीएमआरने व्यक्त केली शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 07:51 IST

coronavirus News : बीसीजी लस टोचल्यानंतर वृद्ध व्यक्तींमध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात. कोरोना संसर्ग होऊ नये किंवा तो झाल्यास त्यातून लवकर बरे होण्यासाठी या वाढीव प्रतिकारशक्तीचा वृद्धांना फायदा होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी देण्यात येणाऱ्या बीसीजी लसीमुळे वृद्ध व्यक्तींमधील प्रतिकारशक्ती वाढते. त्याचा फायदा त्यांना कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी होऊ शकतो असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे. यासंदर्भात आयसीएमआर केलेल्या पाहणीतून हा  निष्कर्ष काढण्यात आला. संस्थेने टि्वटमध्ये म्हटले की, बीसीजी लस टोचल्यानंतर वृद्ध व्यक्तींमध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात. कोरोना संसर्ग होऊ नये किंवा तो झाल्यास त्यातून लवकर बरे होण्यासाठी या वाढीव प्रतिकारशक्तीचा वृद्धांना फायदा होण्याची शक्यता आहे. वृद्धांना बीसीजी लस देऊन त्यांच्या शरीरात वाढलेल्या प्रतिकारशक्तीबाबत आयसीएमआरच्या तज्ञांनी काही निरीक्षणे नोंदविली. कोरोना संसर्ग झाल्यास प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णाची प्रकृती बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या बीसीजी लसीचे आणखी सुपरिणाम काय आहेत, याचा सध्या आयसीएमआर अभ्यास करत आहे. ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनीही बीसीजी लसीवर आणखी संशोधन सुरू केले आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी बीसीजी लसीचा काही उपयोग होतो का, या दिशेने हे संशोधन सुरू आहे. क्षयरोगाबरोबरच अन्य प्रकारच्या संसर्गाला रोखण्यासाठीही बीसीजी लस उपयोगी पडू शकते असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. बाधित आणि मृतांच्या संख्येत होत आहे घट देशात बुधवारी ४५ हजारांहून कमी कोरोना रुग्ण आढळून आले. या संसर्गाच्या रुग्णांची एकूण संख्या ८० लाखांच्या घरात पोहोचली आहे तर बरे झालेल्यांची संख्या ७२ लाख ५९ हजारांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ९०.८५ टक्के आहे. कोरोनामुळे आणखी ५०८ जणांचा मृत्यू झाला असून बळींची एकूण संख्या १,२०,०१०वर पोहोचली आहे.रशियात दुसऱ्या  लसीचेही उत्पादन सुरूस्पुटनिक व्ही लस बनविल्यानंतर रशिया आता दुसरी कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे. या लसीच्या चाचण्या पूर्ण व्हायच्या असल्या तरी उत्पादन करण्यास रशियाने प्रारंभ केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य