coronavirus Baba Ramdev Hits Back At Critics Of Patanjalis Coronil | CoronaVirus News: कोरोनिलमुळे अनेकांना मिरच्या झोंबल्या, कारस्थानामागे ड्रगमाफिया; रामदेव बाबा संतापले

CoronaVirus News: कोरोनिलमुळे अनेकांना मिरच्या झोंबल्या, कारस्थानामागे ड्रगमाफिया; रामदेव बाबा संतापले

हरिद्वार: पतंजलीच्या कोरोनिल औषधामुळे अनेकांना मिरच्या झोंबल्या. त्यामुळेच आमच्याविरोधात देशभरात एफआयआर दाखल झाल्या, अशा शब्दांमध्ये योगगुरू रामदेव बाबांनी त्यांचा संताप व्यक्त केला. कोरोनिलवर टीका करणाऱ्यांवर रामदेव बाबा चांगलेच संतापले. जणू काही आम्ही दहशतवादी आणि देशद्रोही आहोत, अशा प्रकारे आमच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचं ते म्हणाले. 

२३ जूनला रामदेव बाबांनी आचार्य बाळकृष्ण यांच्यासह पत्रकार परिषद घेत कोरोनिल औषध लॉन्च केलं. या औषधामुळे कोरोना आठवड्याभरात बरा होत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र यामुळे मोठा वाद निर्माण झाला. औषधाच्या चाचण्या, ते तयार करण्यासाठी आवश्यक असलेले परवाने यावरून रामदेव बाबा आणि पतंजली वादात सापडले. केंद्र सरकारसोबतच अनेक राज्यांनीदेखील कोरोनिलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर पतंजलीनं यू-टर्न घेतला. कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा कधीही केला नव्हता, असं म्हणत कोलांटउडी मारली.

कोरोनिलवरून निर्माण झालेल्या वादावर आज रामदेव बाबांनी स्पष्टीकरण दिलं. 'नोंदणीपासून ते चाचण्यांपर्यंत सर्व नियमांचं पालन करण्यात आलं असून आम्ही काहीही गैर केलेलं नाही,' असा दावा रामदेव बाबांनी पत्रकार परिषद घेऊन केला. यावेळी त्यांनी कोरोनिलवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. 'पतंजलीनं यू-टर्न घेतल्याचं लोक म्हणतात. आम्ही कोणतंही संशोधन केलं नसल्याचे आरोप करतात. काहींनी थेट माझी जात, धर्म, संन्यास यावरून टीका केली. भारतात आयुर्वेदावर काम करणं म्हणजे जणू काही गुन्हा असल्याचं वातावरण तयार केलं गेलं. आम्हाला आयुर्वेदाच्या माध्यमातून मिळणारं यश पाहून अनेकांना मिरच्या झोंबल्या,' अशा शब्दांत रामदेव बाबा कोरोनिलवर टीका करणाऱ्यांवर बरसले.

आम्ही कोरोनिल औषध लॉन्च करताच मोठं वादळ आलं. ड्रग माफियांना धक्का बसला. भारतविरोधी शक्ती आणि बहुराष्ट्रीय कंपन्या हादरून गेल्या, अशा शब्दांत रामदेव बाबांनी संताप व्यक्त केला. संशोधन करण्याचं काम केवळ टाय घालणारी मंडळी करतात. लंगोट घालणारे लोक केव्हापासून संशोधन करू लागले, असा प्रश्न काहींना पडला. पण संशोधन करण्याचा मक्ता केवळ तुम्हीच घेतला आहे का? ती फक्त मोजक्यांची मक्तेदारी आहे का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

आम्ही कोरोनावर कोणतंही औषध तयार केलं नाही; पतंजलीचा यू-टर्न

कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल

"बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावर औषध, ते मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात’’ 

कुणी 'कोरोनिल' औषध विकताना दिसलं, तर...; 'पतंजली'ला आणखी एका राज्यातून धक्का

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus Baba Ramdev Hits Back At Critics Of Patanjalis Coronil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.