शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

CoronaVirus : आंध्रप्रदेशात कोरोनाच्या आयुर्वेदिक औषधासाठी उडाली झुंबड, शेजारच्या राज्यातील लोकांनीही केली मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 19:26 IST

आनंदैया आपले आयुर्वेदिक औषध लोकांना मोफत देत आहेत. ज्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना आयड्रॉपदेखील दिला जात आहे. मात्र, आयुर्वेदिक औषधाने कोरोना बरा होतो, याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा अद्याप नाही. तरीही येथे मोठ्या संख्येने लोक गर्दी करत आहेत. (Ayurvedic cure for corona draws large crowds in Andhra pradesh)

हैदराबाद - कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक जण उपचार शोधतो आहे. यातच शेकडो लोक कोरोनावरील उपचारासंदर्भात दावा करत आहेत. कुणी गोमूत्राने उपचाराचा दावा करत आहे. तर कुणी जादू-टोन्यावर विश्वास ठेवत आहे. असेच एक अंधविश्वासाचे प्रकरण आंध्र प्रदेशात (Andhra pradesh) समोर आले आहे. (CoronaVirus Ayurvedic cure for corona draws large crowds in Nellore Andhra pradesh)

आंध्र प्रदेशातील नेल्लोर (Nellore ) जिल्ह्यातील एका छोट्या गावात आयुर्वेदिक औषधासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. येथे दूरवरून आलेले लोक कोरोनाच्या उपचारासाठी रोजच्या रोज रांगेत उभे राहतात. खरे तर, येथील आनंदैया नावाच्या एका आयुर्वेदीक डॉक्टरने आपल्या औषधाने कोरोनावरील यशस्वी उपचाराचा दावा केला आहे. त्यांचा हा दावा सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. यामुळे येथे दूरवरून लोक यायला सुरुवात झाली आहे. एवढेच नाही, तर शेजारील राज्यांतूनही येथे मोठ्या प्रमाणावर लोक यायला सुरुवात झाली आहे. 

जीवघेणा म्युकोरमायकोसिस आताच का फोफावतोय? खुद्द एम्सच्या संचालकांनी दिली महत्वाची माहिती

लोकांना मोफत औषध -आनंदैया आपले आयुर्वेदिक औषध लोकांना मोफत देत आहेत. ज्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना आयड्रॉपदेखील दिला जात आहे. मात्र, आयुर्वेदिक औषधाने कोरोना बरा होतो, याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा अद्याप नाही. तरीही येथे मोठ्या संख्येने लोक गर्दी करत आहेत.

औषधावर प्रशासनानं घातली बंदी! -येथे येणाऱ्या एका व्यक्तीने म्हटले आहे, की 'याचा प्रयोग करणे काही वाईट नाही. रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे, ऑक्सिजन बेडसाठी या रुग्णालयातून, त्या रुग्णालयात पळापळ सुरू आहे. यात अनेत लोक आपला जीव गमावत आहेत. आम्हाला आशा आहे, की औषध उपयोगी ठरेल.' माध्यमात आलेल्या काही वृत्तांनुसार, प्रशासनाने सध्या खबरदारी म्हणून या औषधावर बंदी घातली आहे. आयुष आयुर्वेदचे डॉक्टर या औषधाची तपासणी करत आहेत. परिणाम सकारात्मक आल्यास यावर निर्णय घेतला जाईल.

Corona Vaccine: कोविशिल्ड लस कोव्हॅक्सीन प्रमाणे शक्तीशाली नाही? एका क्लिकवर जाणून घ्या, नेमकं काय आहे तथ्य

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेशdoctorडॉक्टरCentral Governmentकेंद्र सरकार