Coronavirus: कोरोनापासून वाचवण्यासाठी आल्या पऱ्या, लोकांना वाटल्या खऱ्या, दर्शनासाठी जमली हजारोंची गर्दी    

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 04:31 PM2021-06-03T16:31:50+5:302021-06-03T16:32:30+5:30

Coronavirus in India: कोरोनाकाळात समाजामध्ये अफवाही मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अंधविश्वासामुळे लोकही अशा अफवांवर विश्वास ठेवत आहेत.

Coronavirus: Angels came to save from Coronavirus, people thought it was real, thousands of people gathered to see | Coronavirus: कोरोनापासून वाचवण्यासाठी आल्या पऱ्या, लोकांना वाटल्या खऱ्या, दर्शनासाठी जमली हजारोंची गर्दी    

Coronavirus: कोरोनापासून वाचवण्यासाठी आल्या पऱ्या, लोकांना वाटल्या खऱ्या, दर्शनासाठी जमली हजारोंची गर्दी    

Next

भोपाळ - गेल्या सव्वा वर्षापासून देशात कोरोनाच्या साथीचा फैलाव सुरू आहे. कोट्यवधी लोकांना आजारी पाडणाऱ्या आणि लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या या विषाणूवर अद्याप हमखास असे औषध सापडलेले नाही. मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस ही परिणामकारक ठरत असल्याने लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्यात येत आहे. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र या कोरोनाकाळात समाजामध्ये अफवाही मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अंधविश्वासामुळे लोकही अशा अफवांवर विश्वास ठेवत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील राजगड मध्ये घडला आहे. (Angels came to save from Coronavirus, people thought it was real, thousands of people gathered to see)

कोरोनापासून जगाला वाचवण्यासाठी दोन पऱ्या आल्या आहेत, अशी अफवा मध्य प्रदेशमधील राजगड येथील चाटूखेडा गावामध्ये पसरली. त्यानंतर या पऱ्यांच्या दर्शनासाठी हजारो लोकांची गर्दी जमली. यावेळी जमलेल्या लोकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही उल्लंघन केले. येथील लोकांना गावातील दोन महिलांच्या शरीरामध्ये देवपऱ्या आल्याचे सांगितले. या पऱ्यांच्या हातातून जो कुणी आपल्या अंगावर पाणी शिंपडून घेईल. त्याला कोरोना होणार नाही, असा दावा करण्यात आला. त्यामुळे या देवीपऱ्यांकडून पवित्र पाणी शिंपडून घेण्यासाठी घराघरांमधून लोक बाहेर पडले. 

बघता बघता मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला. जमलेले लोक कोरोनाबाबतच्या कुठल्याही नियमांचे पालन करत नव्हते. तसेच त्यांच्यापैकी अनेकांनी मास्कही लावला नव्हता. तसेच सोशल डिस्टंसिंगचेही ते पालन करत नव्हते. 
 
अखेर या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी लोकांना तिथून हटवले आणि पऱ्या असल्याचा दावा करणाऱ्या दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला.  

Web Title: Coronavirus: Angels came to save from Coronavirus, people thought it was real, thousands of people gathered to see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.