शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

Coronavirus : प्रवासी मजुरांची मुंबईत गर्दी झाल्यानंतर अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 09:33 IST

वांद्रा येथे जमलेल्या जमावाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे.

मुंबई- लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी जमावाला पांगवलं. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी जवळपास ८०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रा येथे जमलेल्या जमावाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना थेट फोन लावला आणि वांद्र्यात जमलेल्या गर्दीबाबत चिंता अन् नाराजी व्यक्त केली. अशा घटनांमुळे कोरोना व्हायरसच्या विरोधात भारताची लढाई कमकुवत होत आहे. प्रशासनानंही अशा घटना होऊ नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील सरकारला माझं पूर्ण समर्थन असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या राज्यांमध्ये जाण्यासाठी १४ तारखेनंतर ट्रेन सुरू होत आहेत, असे कळल्याने लोकांनी वांद्रे स्टेशनला गर्दी केली. कोणीतरी तसे पिल्लू सोडल्याने हा प्रकार घडला. परप्रांतातील लोकांनी त्यांच्या राज्यात जाण्याची घाई करू नये त्यांची आम्ही सर्व व्यवस्था केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. केंद्र व राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला हातात हात घालून करीत असल्याचे ते म्हणाले. राज्यातील जनतेशी मंगळवारी संवाद साधताना त्यांनी वांद्रे  येथे घडलेल्या घटनेचा आवर्जून उल्लेख केला होता.आदित्य ठाकरेंचा यू-टर्नकेंद्राने मजुरांना गावी जाण्याची संधी दिली नाही. राज्याने त्यासाठी एक दिवसाची मुभा मागितली होती. तशी मागणी केल्याचे सांगत आज आदित्य ठाकरे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. मात्र, यावर २९ मार्चला आदित्य यांनी वेगळेच टि्वट केल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मजूर व बेघरांनी परत जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी केले आहे, त्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला त्यांनी दिले आहेत. ‘स्थलांतर थांबवा, जीव वाचवा’ असे आवाहन आदित्य यांनी आधीच्या टि्वट मध्ये केले होते. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे