CoronaVirus: aiims doctor pregnant wife corona virus positive rkp | CoronaVirus : AIIMSमधील 'त्या' डॉक्टरची गर्भवती पत्नी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह!

CoronaVirus : AIIMSमधील 'त्या' डॉक्टरची गर्भवती पत्नी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह!

नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी उघड झाले. या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना क्वारंटाइन करण्याचे काम सुरु आहे. तसेच, या डॉक्टरच्या पत्नीचा रिपोर्ट सुद्धा आता कोरोनो पॉझिटिव्ह आला आहे. ती गर्भवती आहे. सध्या तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून तिची प्रसूती एम्स रुग्णालयातच होणार आहे. एम्सचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, "डॉक्टरच्या पत्नीच्या प्रसुतीवेळी आम्ही विशेष काळजी घेणार आहोत. येथील डॉक्टरांच्या उपचारांसाठी काही प्रोटोकॉल असतात, ते पूर्णपणे पाळले जातील."

दरम्यान, याआधी बुधवारी दिल्लीतील सरकारी रुग्णालयातील दोन डॉक्टरांना कोरोनीची बाधा झाल्याचे आढळून आले होते. यामधील एक डॉक्टर रुग्णांवर उपचार करत होते. ते रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. याशिवाय, एक महिला डॉक्टर दुबईहून भारतात परतली होती. ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही डॉक्टरांना आयसोलेट केले आहे. तसेच, यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही क्वारंटाइन केले आहे.

याचबरोबर, बुधवारी दिल्ली येथीलच सरदार पटेल रुग्णालयातील एका डॉक्टरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तसेच, दिल्ली स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या डॉक्टराला कोरोनाचा संसर्ग कोणत्याही रुग्णाकडून झाला नसून,  आपल्या भावाच्या संपर्कात आल्यामुळे झाला. जो युनायटेड किंगडमहून परतला होता.

दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे १४१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या २९३ वर पोहोचली आहे. गुरुवारी जे १४१ कोरोनाचे रुग्ण आढळले, त्यापैकी १२९ रुग्ण हे तबलिगी जमातच्या मरकजमध्ये उपस्थित होते.
 

Web Title: CoronaVirus: aiims doctor pregnant wife corona virus positive rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.