शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

coronavirus: एम्सच्या महासंचालकांनी कोरोनाचा संसर्ग झालेल्या ८० टक्के रुग्णांना आरोग्याबाबत दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 14:56 IST

एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अनेक बाधित लोक कोरोनाच्या संसर्गाला गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत अशा कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे कोरोनावर मात केल्यानंतरही ६० ते ८० टक्के लोकांमध्ये काही ना काही समस्या दिसून येत आहेत चिंतेची बाब म्हणजे काही रुग्णांमध्ये फुप्फुस आणि हृदयासंबंधीच्या समस्याही दिसून येत आहेतकोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेक रुग्णांच्या जीवनमानावर परिणाम झालेला दिसत आहे

मुंबई - देशातील कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. दरम्यान, दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अनेक बाधित लोक कोरोनाच्या संसर्गाला गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत अशा कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर इशारा दिला आहे.डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे अनेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. मात्र असे असले तरी कोविड-१९ ला गांभीर्याने न घेण्याची चूक करू नका, कारण कोरोनावर मात केल्यानंतरही ६० ते ८० टक्के लोकांमध्ये काही ना काही समस्या दिसून येत आहेत. ही समस्या अंगदुखीसारखी सामान्यही असू शकते. मात्र चिंतेची बाब म्हणजे काही रुग्णांमध्ये फुफ्फूस आणि हृदयासंबंधीच्या समस्याही दिसून येत आहेत.नॅशनल ग्रँड राऊंड -७ ऑनलाइन कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच कोरोनानंतर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी डॉक्टरांनी सज्ज राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले, कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रुग्णांची फुप्फुसे कमकुवत होत आहेत. त्यामुळे त्यांना दीर्घकाळापर्यंत ऑक्सिजनची गरज भासू शकते. अशा रुग्णांच्या फुप्फुसामध्ये फाइब्रोसिसची गंभीर समस्या दिसून येत आहे.त्यांनी सांगितले की, कोरोनामुक्त झालेल्या दोन रुग्णांची फुप्फुसे खराब झाली होती. त्यांना फुप्फुस प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला आहे. हल्लीच यापैकी एका रुग्णावर फुप्फुस प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया झाली आहे.तसेच कोरोनामुळे काही रुग्ण स्ट्रोकची शिकार झाले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेक रुग्णांच्या जीवनमानावर परिणाम झालेला दिसत आहे. तसेच अनेक कोरोनामुक्त रुग्णांमध्ये हृदयरोगासारख्या समस्या दिसून येत आहेत, असेही गुलेरिया यांनी सांगितले.देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक, पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारीदेशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी उपाय केले जात असतानाच कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून नवा उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 44 लाखांवर पोहोचली असून पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी समोर आली आहे.  भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 44,65,864 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 75062 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (10 सप्टेंबर) देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 95,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 44 लाख 65 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 75 हजारांवर पोहोचला आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य