CoronaVirus News: कोरोनाची लस तयार केल्यावर पारशी समाजासाठी कोटा असणार का?; सीरमच्या पुनावालांचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 19:17 IST2020-07-26T19:12:38+5:302020-07-26T19:17:18+5:30

CoronaVirus News: रॉनी स्क्रूवाला यांच्या प्रश्नाला अदार पुनावाला यांच्याकडून मजेशीर उत्तर

coronavirus Adar Poonawala And Ronnie Screwvala Expressed Concern Over Parsi Community On Twitter | CoronaVirus News: कोरोनाची लस तयार केल्यावर पारशी समाजासाठी कोटा असणार का?; सीरमच्या पुनावालांचं भन्नाट उत्तर

CoronaVirus News: कोरोनाची लस तयार केल्यावर पारशी समाजासाठी कोटा असणार का?; सीरमच्या पुनावालांचं भन्नाट उत्तर

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून रुग्णांच्या संख्येत अतिशय झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष कोरोनावरील लसीकडे लागलं आहे. यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठानं मोठी आघाडी घेतली आहे. ऑक्सफर्डनं लसीच्या उत्पादनासाठी भारतातल्या सीरम इन्स्टिट्यूटसोबत करार केला  आहे. त्यामुळे ऑक्सफर्डच्या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास नंतरच्या घडामोडींमध्ये सीरमची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला पुनावाला यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे.

कोरोनावरील लसीचं उत्पादन केल्यानंतर पारशी समुदायाचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसींचा विशेष कोटा राखीव ठेवणार का, असा प्रश्न स्वदेश फाऊंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून अतिशय गमतीनं विचारला. स्क्रूवाला यांच्या प्रश्नाला पूनावाला यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिलं. आम्ही एकाच दिवसात लसींचं इतकं उत्पादन करू की संपूर्ण जगभरातला पारशी समाज सुरक्षित होईल, अशा शब्दांत पुनावाला यांनी स्क्रूवाला यांच्या ट्विटला रिप्लाय दिला.

Web Title: coronavirus Adar Poonawala And Ronnie Screwvala Expressed Concern Over Parsi Community On Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.