शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

CoronaVirus: मरकज प्रकरणी ९६० तबलिगींचे पासपोर्ट रद्द; गृह मंत्रालयाकडून काळ्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 8:31 PM

Coronavirus: निझामुद्दीनमधील मरकजमध्ये जवळपास ९ हजार तबलिगींचा सहभाग

नवी दिल्ली: गेल्या महिन्यात निझामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या ९६० परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. मरकजमध्ये सहभागी झालेल्या ९६० जणांना काळ्या यादीत टाकण्यात आलं असून त्यांचे पर्यटन व्हिसा रद्द करण्याची कारवाई गृह मंत्रालयानं केली आहे. जमातशी संबंधित असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या व्यक्तींविरोधात परदेशी कायदा १९४६ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना गृह मंत्रालयानं दिल्ली पोलीस आणि अन्य राज्यांच्या डीजीपींना दिल्या आहेत. १८ मार्चला निझामुद्दीनमध्ये तबलिगी जमातीच्या मरकजचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शेकडो तबलिगी सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं. मरकजनंतर बरेचसे तबलिगी देशभरातील त्यांच्या राज्यांमध्ये परतले. मरकजमध्ये सहभागी होण्यासाठी काही तबलिगी पर्यटन व्हिसावर परदेशातून आले होते. पर्यटन व्हिसावर भारतात येणाऱ्या व्यक्तींना धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. त्यासाठी दुसऱ्या प्रकारचा व्हिसा आवश्यक असतो.दक्षिण दिल्लीतल्या निझामुद्दीनमध्ये आयोजित मरकजमध्ये तबलिगी समाजाशी संबंधित जवळपास ९ हजार जण सहभागी झाल्याची आकडेवारी सरकारी यंत्रणेला मिळाली आहे. त्यांची ओळख पटवण्यात आली असून त्यांना क्वॉरेंटाईनदेखील करण्यात आलं आहे. यातील ४०० जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. मरकजमध्ये सहभागी झालेले तबलिगी कोणकोणत्या राज्यात गेले, याची आकडेवारी अग्रवाल यांनी दिली. त्यानुसार महाराष्ट्रात एकूण १४०० तबलिगी परतले असून त्यातील १३०० जणांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आलं आहे. त्यांना क्वॉरेंटाईन करण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या