Coronavirus: भारतात आढळले कोरोनाचे ९२ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 06:35 IST2020-03-31T01:50:17+5:302020-03-31T06:35:29+5:30
कोविड-१९ च्या चाचण्यांसाठी ४७ खासगी प्रयोगशाळांना परवानगी दिली गेली असून, तीन दिवसांत खासगी प्रयोगशाळांत १,३३४ चाचण्या केल्या गेल्या

Coronavirus: भारतात आढळले कोरोनाचे ९२ नवे रुग्ण
नवी दिल्ली : देशात सोमवारी कोविड-१९ चे १०७१ रुग्ण असून, २९ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारपासून देशात ९२ नवे रुग्ण समोर आले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.
यावेळी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतील एपिडेमियॉलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख रमण आर. गंगाखेडकर यांनी सांगितले की, आतापर्यंत ३८ हजार ४४२ चाचण्या घेण्यात आल्या व त्यातील ३,५०१ एकट्या रविवारी केल्या गेल्या. कोविड-१९ च्या चाचण्यांसाठी ४७ खासगी प्रयोगशाळांना परवानगी दिली गेली असून, तीन दिवसांत खासगी प्रयोगशाळांत १,३३४ चाचण्या केल्या गेल्या.