शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

coronavirus: दिलासादायक! देशातील ९१% रुग्णांनी कोरोनावर केलेली मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 05:15 IST

Corona India News : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७९,९०,३२२ असून, बुधवारी ४३,८९३ नवे कोरोना रुग्ण सापडले होते. बरे झालेल्यांची संख्या ७२,५९,५०९ आहे. 

नवी दिल्ली : देशामध्ये बुधवारी ४५ हजारांहून कमी कोरोना रुग्ण आढळून आले. या संसर्गाच्या रुग्णांची एकूण संख्या ८० लाखांच्या घरात पोहोचली आहे, तर बरे झालेल्यांची संख्या ७२ लाख ५९ हजारांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ९०.८५ टक्के आहे. कोरोनामुळे आणखी ५०८ जणांचा मृत्यू झाला असून, बळींची एकूण संख्या १,२०,०१० वर पोहोचली आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७९,९०,३२२ असून, बुधवारी ४३,८९३ नवे कोरोना रुग्ण सापडले होते. बरे झालेल्यांची संख्या ७२,५९,५०९ आहे.  उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सलग सहा दिवस ७ लाखांहून कमी आहे. उपचार घेत असलेल्यांची संख्या बुधवारी ६,१०,८०३ होती.  हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ७.६४ टक्के आहे.इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेने सांगितले की, २७ ऑक्टोबरला देशात १०,६६,७८६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे आता या चाचण्यांची एकूण  संख्या १०,५४,८७,६८० झाली  आहे. कोरोना बळींची संख्या कर्नाटकमध्ये १०,९९१,  उत्तर प्रदेशात ६,९४०, आंध्र प्रदेशमध्ये ६,६२५, पश्चिम बंगालमध्ये ६,६०४, दिल्लीत ६,३५६, पंजाबमध्ये ४,१३८, गुजरातमध्ये ३,६९५ आहे. 

रुग्णांचा भारतात मृत्यूदर अवघा दीड टक्का 10 लाखांमागे कोरोना रुग्णांचे कमी प्रमाण असलेल्या देशांमध्ये भारताने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५० टक्का इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे.  5,552 कोरोना रुग्ण जागतिक पातळीवर दर दहा लोकांमागे सापडतात.  5,790 भारतामध्ये हेच प्रमाण इतके आहे.  अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, दक्षिण आफ्रिकेत दर दहा लोकांमागे कोरोना रुग्णांचे प्रमाण भारतापेक्षाही अधिक आहे. ८७ रुग्णांचा मृत्यू देशात दर दहा लाख लोकांमागे होतो. जागतिक स्तरावर हाच आकडा १४७ इतका आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत