Coronavirus : 82-year-old grandfather left home; Everyone was amazed at what the police did! pda | CoronaVirus : ८२ वर्षांचे आजोबा घराबाहेर पडले; पोलिसांनी जे केलं त्याने सगळेच चकित झाले!

CoronaVirus : ८२ वर्षांचे आजोबा घराबाहेर पडले; पोलिसांनी जे केलं त्याने सगळेच चकित झाले!

ठळक मुद्देमी हृदयविकाराचा रुग्ण आहे आणि मी माझ्या औषधांसाठी लागणाऱ्या पैशासाठी सकाळी दुकान उघडतो.दुपारी पोलीस खदार यांच्या घरी परत आले. परंतु यावेळी ते वृद्ध व्यक्तीसाठी दोन महिन्यांची तरतुदी करत औषधे आणि काही रक्कम घेऊन पोलीस आले होते.

मुतीचूर - लॉकडाऊन निर्बंधाचे उल्लंघन करीत नागरिक पहाटे एकत्र गोळा होत असल्याचे माहिती मिळताच अंथकड पोलीस मुतीचूर कडवुजवळ चहाच्या दुकानात पोहोचले. जेव्हा पोलीस 82 वर्षीय चहा दुकान मालक खदार याला सांगितले की, दुकान सुरू करू नये जेणेकरून गर्दी जमणार नाही. त्यावर 82 वर्षीय वृद्ध माणूस आपले अश्रू रोखू शकला नाही.


मी हृदयविकाराचा रुग्ण आहे आणि मी माझ्या औषधांसाठी लागणाऱ्या पैशासाठी सकाळी दुकान उघडतो. मी माझ्या मुलांना त्रास न देता जगू इच्छितो. कृपया समजून घ्या, अशी विनवणी पोलिसांना वृद्ध चहा दुकानदाराने केली. मात्र, पोलिसांनी पर्वा न करता पोलीस अधिकाऱ्यांनी खदार यांना कडक शब्दांत सांगितले की, दुकान बंद करा आणि लॉकडाऊन उघडेपर्यंत घरीच रहा. लॉकडाऊनदरम्यान दुकान उघडल्यास त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी खदार यांना दिला. 

काहीच पर्याय न उरल्याने खदार यांनी दुकान बंद केले. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षकांनी खदार यांच्याकडून औषधांचे प्रिस्क्रिप्शन घेतलं. त्यानंतर वयोवृद्ध खदार निराशेने घरी परत गेले आणि पोलिसही तेथून निघून गेले. तथापि, दुपारी पोलीस खदार यांच्या घरी परत आले. परंतु यावेळी ते वृद्ध व्यक्तीसाठी दोन महिन्यांची तरतुदी करत औषधे आणि काही रक्कम घेऊन पोलीस आले होते. खदारच्या घराचा रस्ता जाण्यासाठी अरुंद असल्याने वाहन जाऊ शकत नसल्याने पोलिसांनी डोक्यावर व खांद्यावर सामान घेऊन वृद्ध चाहवाल्यांना घरपोच केले. 

 

पी. के. मनोज कुमार (एसएचओ), के. जे. जिनेश (एसआय) आणि सीपीओचे एम. ए. शिहाब, सी. पी. अजीथ आणि ओ. एस. सासविथ हे अंथकड जनमैथ्री पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या पोलीस अधिकाऱ्यांनी खदार यांना अशा प्रकारे आश्चर्यचकित केले. 

Web Title: Coronavirus : 82-year-old grandfather left home; Everyone was amazed at what the police did! pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.