शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

coronavirus: कोरोनाकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीवर ७७ टक्के जनता समाधानी : सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 13:38 IST

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने बघता बघता २० लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या या आपातकालीन परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेणारा एक सर्वे समोर आला आहे.

ठळक मुद्देया सर्व्हेत सहभागी झालेल्या ४८ टक्के लोकांनी कोरोनाविरोधात मोदी सरकारने चांगलं काम केल्याचे मत व्यक्त केले२९ टक्के लोकांनी कोरोनाला रोखण्यात खूप चांगली कामगिरी बजावल्याचे सांगितले५ टक्के लोकांनी कोरोनाच्या संकटकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या देशातील परिस्थिती दिवसागणित चिंताजनक होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने बघता बघता २० लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या या आपातकालीन परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेणारा एक सर्वे समोर आला आहे. १९ राज्यांमध्ये झालेल्या या सर्व्हेत सहभागी झालेल्या ४८ टक्के लोकांनी कोरोनाविरोधात मोदी सरकारने चांगलं काम केल्याचे मत व्यक्त केले. तर २९ टक्के लोकांनी कोरोनाला रोखण्यात खूप चांगली कामगिरी बजावल्याचे सांगितले.आज तक-इंडिया टुडे समुहासाठी मूड ऑफ द नेशन अंतर्गत हा सर्वे कर्वी इनसाइ़ड लिमिटेडने केला. देशातील ६७ टक्के लोक कोरोनाकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे या सर्वेमध्ये दिसून आले. तर १८ टक्के लोकांनी कोरोनानाकाळातील मोदी सरकारची कामगिरी सरासरी असल्याचे सांगितले. उर्वरित ५ टक्के लोकांनी कोरोनाच्या संकटकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले.कोरोनामुळे किती नुकसान झाले याचे उत्तर देताना २२ टक्के लोकांनी व्यवसाय आणि नोकरीमध्ये नुकसान झाल्याचे सांगितले. तर ६३ टक्के लोकांनी कोरोनाच्या संकटानंतर आपल्या आर्थिक कमाईत घट झाल्याचे सांगितले. तर १५ टक्के लोकांनी आपल्या कमाईत कोणतीही घट झाली नसल्याचे सांगितले. केवळ १ टक्का लोकांनी कोरोनाच्या या संकटकाळात आपली कमाई वाढल्याचे सांगितले.लॉकडाऊनमुळे लोकांचे आयुष्य वाचवता येऊ शकेल का या प्रश्नाचे उत्तर देताना ३४ टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. तर ३८ टक्के लोकांनी आर्थिक अडचणी आल्याचे मान्य करत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लॉकडाऊन उपयुक्त ठरल्याचे सांगितले. तर २५ टक्के लोकांनी याबाबत नकारार्थी उत्तर दिले. ३ टक्के लोकांनी याबाबत काहीही मत व्यक्त केले नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार