coronavirus: सहावा आठवडा ठरला सर्वाधिक रुग्णांचा, टर्की, इराणच्या तुलनेत भारत सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 06:40 AM2020-05-16T06:40:40+5:302020-05-16T06:43:02+5:30

सलग लॉकडाऊनच्या सहाव्या आठवड्यात भारतात सर्वाधिक २३ हजार १०९ नव्या रुग्णांची भर पडली.

coronavirus: 6th week most patients, India more alert than Turkey, Iran | coronavirus: सहावा आठवडा ठरला सर्वाधिक रुग्णांचा, टर्की, इराणच्या तुलनेत भारत सतर्क

coronavirus: सहावा आठवडा ठरला सर्वाधिक रुग्णांचा, टर्की, इराणच्या तुलनेत भारत सतर्क

Next

- टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : सलग चौथ्यांदा लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत मिळत असताना गेल्या सात आठवड्यांमध्ये रुग्णसंख्याही झपाट्याने वाढली. केवळ भारतातच नव्हे, तर आशिया खंडातील टर्की व इराणमध्येही गेल्या दीड महिन्यापासून रुग्णसंख्या लॉकडाऊन असूनही पहिल्या आठवड्यातील रुग्णांची संख्या ७५२ वरून शेवटच्या आठवड्यात ८१ हजारांवर गेली. सलग लॉकडाऊनच्या सहाव्या आठवड्यात भारतात सर्वाधिक २३ हजार १०९ नव्या रुग्णांची भर पडली. इराणमध्ये १ लाख १६ हजार ६३५ जणांना कोरोनाने ग्रासले असून, १ ते २१ एप्रिलदरम्यान कोरोनाचा कहर तेथे वाढला. ११ मार्चला तेथे १ रुग्ण होता, तर ६ मे रोजी तेथे १ लाख १ हजार ६५० रुग्ण आढळून आले. तुर्कस्थानमध्ये १ लाख ४४ हजार ७४९ जणांना कोरोनाची बाधा झाली. १० मार्चला पहिला रुग्ण तेथे आढळला होता, तर एक लाख रुग्णसंख्या २३ एप्रिलला नोंदविण्यात आली. भारताने आर्थिक नुकसान सहन करून लॉकडाऊन जाहीर केले व या देशांच्या तुलनेत कोरोना प्रसाराला आळा घातला. भारतात १ एप्रिलला १९९८ रुग्ण होते. अद्याप भारतातील रुग्णसंख्या लाखाच्या आत आहे. देशात १५ फेब्रुवारीला पहिल्या ३ रुग्णांची नोंद झाली होती.
पहिला रुग्ण आढळल्यापासून...
भारत : ६० दिवसांमध्ये १ वरून ७२ हजारांवर रुग्ण
इराण : ५६ दिवसांमध्ये एकावरून रुग्णसंख्या लाखावर
टर्की : ४४ दिवसांमध्ये एका रुग्णापासून १ लाखावर रुग्णसंख्या


जगात १७.२५ लाख रुग्ण झाले बरे : जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या ४५ लाख ७० हजारांपैकी १७ लाख २५ हजारांवर रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत आणि सध्या २५ लाख ३३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या ३ लाख ४ हजारांवर पोहोचली.

Web Title: coronavirus: 6th week most patients, India more alert than Turkey, Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.