शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

Coronavirus : 'लॉकडाऊनमध्ये आमच्या शिक्षिका क्लास घेतात', 5 वर्षांच्या चिमुकल्याची थेट पोलिसांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 13:42 IST

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र यात दरम्यान एक घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर याच काळात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 381 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता या लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही याबाबत आज पंतप्रधान मोदी आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र यात दरम्यान एक घटना समोर आली आहे. 

लॉकडाऊनमध्ये खासगी शिकवणी (ट्यूशन) घेणं एका शिक्षिकेला चांगलंच महागात पडलं आहे. लॉकडाऊनमध्ये आमच्या शिक्षिका क्लास घेतात अशी तक्रार एका 5 वर्षांच्या चिमुकल्याने थेट पोलिसांकडे केल्याची घटना समोर आली आहे. पंजाबमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये पोलिसांना एक व्यक्ती दोन लहान मुलांना बाहेर घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याबाबत व्यक्तीकडे चौकशी केली असता,  5 वर्षांच्या चिमुकल्याने सत्य सांगत आमच्या शिक्षिका ट्यूशन घेतात अशी तक्रार पोलिसांकडे केली. एवढेच नाही तर तो पोलिसांना घेऊन शिक्षिकेच्या घरी देखील गेला.

पोलिसांनी मुलांच्या नातेवाईकांकडे ट्यूशनबाबत चौकशी केली. तसेच त्यांना सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. पोलीस उपअधीक्षक गुरदीप सिंह यांनी 'लोकांना लॉकडाऊनमध्ये घरी थांबायला सांगितलं जात आहे. आम्ही वारंवार बाहेर पडू नका असं आवाहन करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना शिकवणीसाठी पाठवत आहात. शाळा बंद आहेत मग तुम्ही मुलांना का बाहेर पाठवत आहात?' अशी विचारणा केली आहे. तसेच या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलगा पोलिसांना घेऊन शिक्षिकेच्या घऱी गेला. तेव्हा शिक्षिकेने आपण ट्यूशन घेत नसल्याचा दावा केला. पण मुलाने त्या खोटं बोलत असून अजून तीन मुलं शिकवणीसाठी येतात अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शिक्षिकेला आणि मुलांच्या कुटुंबियांनाही चांगलंच खडसावलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात एकूण 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 892 पर्यंत पोहोचला आहे. तसेच दिवसभरात 48 जणांचा मृत्यू झाला असून, देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 872 झाला आहेत. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात 381 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 6 हजार 185 झाला आहे. त्यामुळे कोरोनाला मात देत बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी 22.17 झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 28 हजारांजवळ, 24 तासांत 48 जणांचा मृत्यू

Coronavirus:...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षकStudentविद्यार्थीPunjabपंजाबPoliceपोलिस