शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

CoronaVirus : धक्कादायक! न्यूज चॅनलचे २५ कर्मचारी कोरोना 'पॉझिटिव्ह', लाईव्ह शो रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 15:45 IST

CoronaVirus: २५ कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

चेन्नई : भारतात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल 18 हजारांवर गेला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता चेन्नईमधील एका न्यूज चॅनलच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

येथील राज्य सरकारच्या माहितीनुसार, तमीळ न्यूज चॅनलमध्ये कार्यरत असणाऱ्या २५ लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये पत्रकार, कॅमेरापर्सन आणि इतर लोकांचा समावेश आहे. दरम्यान, या तमीळ न्यूज चॅनलच्या जवळपास ९४ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामुळे न्यूज चॅनलला आपला लाईव्ह कार्यक्रम सुद्धा रद्द करावा लागला. तसेच, २५ कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, आधीच मुंबईतील तब्बल ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात पत्रकारांची संघटना टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने मुंबईतील १६७ जणांची कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचे रविवारी रिपोर्ट आले. यामध्ये १६७ जणांपैकी ५३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यामधील सर्वाधिक पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियामधील आहेत.

देशामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता तब्बल 18 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे ४७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १ हजार ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार ७५९ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३२५२ लोकांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJournalistपत्रकारTelevisionटेलिव्हिजन