नांदेडमधून पंजाबला गेलेले १७० भाविक कोरोना पॉझिटिव्ह, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 11:58 AM2020-05-01T11:58:16+5:302020-05-01T12:03:00+5:30

नांदेड येथून पंजाबमध्ये परतलेल्या भाविकांपैकी तब्बल १७० भाविक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने दोन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांस सुरुवात झाली आहे.

CoronaVirus: 170 devotees Corona positive who traveled from Nanded to Punjab, Punjab Health Minister makes serious allegations against Maharashtra Government BKP | नांदेडमधून पंजाबला गेलेले १७० भाविक कोरोना पॉझिटिव्ह, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप

नांदेडमधून पंजाबला गेलेले १७० भाविक कोरोना पॉझिटिव्ह, पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांचा महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकारने नांदेड येथील गुरुद्वारात अडकलेल्या भाविकांची कोरोना चाचणी केली नाहीया प्रकाराबाबत अकाली दलाने पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनाच दोषी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.सध्याच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३५७ रुग्ण सापडले आहेत. पैकी ९० रुग्ण बरे झाले आहेत, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

चंदिगड - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर, प्रवासी आणि भाविक देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. अशा व्यक्तींना त्या्ंच्या घरी पाठवण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अशा प्रकारचे स्थलांतर हे एकप्रकारे नवे संकट ठरण्याची शक्यता आहे. नुकतेच महाराष्ट्रातील नांदे़ड येथे अडकलेल्या हजारो शीख भाविकांना पंजाब सरकारने विशेष बसमधून आपल्या राज्यात परत नेले होते. मात्र या भाविकांपैकी तब्बल १७० भाविक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने दोन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांस सुरुवात झाली आहे. त्यातच पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनी या प्रकारबाबत महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंह सिद्धू म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने नांदेड येथील गुरुद्वारात अडकलेल्या भाविकांची कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत अकाली दलाने पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनाच दोषी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

लॉकडाऊनदरम्यान अकाली दलानेच नांदेड येथे अडकलेल्या भाविकांचा प्रश्न उपस्थित केला होता. नांदेडहून भाविक पंजाबमध्ये परतल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली नाही. तसेच त्यांना क्वारेंटाइन करण्याबाबतही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे या चुकीबद्दल आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अकाली दलाच्या नेत्यांनी केली आहे.

दरम्यान, देशातील इतर काही राज्यांप्रमाणे पंजाबमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३५७ रुग्ण सापडले आहेत. पैकी ९० रुग्ण बरे झाले आहेत, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित २४८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: CoronaVirus: 170 devotees Corona positive who traveled from Nanded to Punjab, Punjab Health Minister makes serious allegations against Maharashtra Government BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.