शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
3
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
4
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
5
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
6
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम समोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
7
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
8
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
10
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
11
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
12
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
13
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
14
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
15
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
16
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
17
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
18
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
19
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
20
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक

Coronavirus: इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची बाधा; एम्सकडून दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 11:19 AM

देशात आतापर्यंत २१ जणांना कोरोनाची बाधा

ठळक मुद्देदेशातल्या कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली २१ वरइटलीहून आलेल्या पर्यटकांना आयटीबीपीच्या छावणीत हलवलंनोएडामधील कोरोनाच्या ६ संशयितांच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह

नवी दिल्ली: पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या २१ पैकी १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. सर्व पर्यटकांना हरयाणातल्या छावलामधील आयटीबीपीच्या छावणीत ठेवण्यात आलं आहे. नोएडातल्या तीन मुलांसह सहा जणांचे नमुनेदेखील चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचं चाचणी अहवालातून समोर आलं. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सहा जणांना पुढील १४ दिवस त्यांच्या घरात कुटुंबीयांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यास त्यांच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  कालपर्यंत देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या ६ होती. त्यात आता इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांची भर पडल्यानं हा आकडा २१ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६ भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला. यातले तीन जण केरळचे होते. या सर्व रुग्णांवर उपचार पूर्ण झाले आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाची पावलं उचलली आहेत. तीन मार्च किंवा त्याआधी व्हिसा जारी करण्यात आलेल्या इटली, इरान, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना भारतात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजदूत, संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, ओसीआय कार्डधारक यांना मात्र यामधून वगळण्यात आलं आहे. मात्र त्यांना वैद्यकीय चाचण्यांनंतर देशात प्रवेश दिला जाईल. 

टॅग्स :corona virusकोरोना