Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढ्याला तब्बल १00 दिवस पूर्ण; आयुष्यच बदललं, वाचा काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:07 IST2020-07-02T03:09:36+5:302020-07-02T07:07:34+5:30
सांत्वनही फोनवरूनच करावे लागते. हे किती दिवस चालणार, याची माहिती नाही. रोजगार, उद्योग कधी सुरू होणार, हाही प्रश्न आहे.

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढ्याला तब्बल १00 दिवस पूर्ण; आयुष्यच बदललं, वाचा काय घडलं?
मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सर्वांनी दाखवलेल्या आत्मसंयमास बुधवारी शंभर दिवस पूर्ण होत आहेत. या काळात मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टसिंग, क्वारंटाइन, आयसोलेशन, थर्मल स्क्रीनिंग, ऑक्झिमीटर, पीपीई किट्स, स्वॅब, हँडवॉश हे परवलीचे शब्द झालेत. सारे आयुष्यच आता बदलून गेले आहे.
कोणाला ताप आला, शिंका आल्या वा कोणी थंकला तरी आता घबराट उडते. कोरोनामुळे कार्यालये, घरांतील एसी बंद झाले, थंड पाणी, शीतपेयांचा वापर कमी झाला. लोक एकमेकांशी अंतर ठेवूनच बोलतात, हात मिळवत नाहीत, मिठ्या मारत नाहीत, एकमेकांच्या डब्यातील खात नाहीत, एकमेकांच्या घरीही जात नाहीत. दुर्दैवाची बाब म्हणजे कोणी आजारी असला वा ओळखीत कोणाचे निधन झाले तरी त्या घरी आता जाता येत नाही. सांत्वनही फोनवरूनच करावे लागते. हे किती दिवस चालणार, याची माहिती नाही. रोजगार, उद्योग कधी सुरू होणार, हाही प्रश्न आहे.
या १00 दिवसांत काय काय घडले, याचा आढावा वाचा
केंद्र सरकारचे महत्त्वाचे निर्णय; कोरोना काळात राबवल्या अनेक योजना!
कोरोनाचा धडा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करा; आरोग्य यंत्रणेकडील दुर्लक्ष भोवले!