CoronaVaccineUpdate People will get free corona vaccine in these states including Uttar Pradesh Madhya pradesh Bihar kerala and assam | CoronaVaccineUpdate : यूपी, बिहार, एमपीसह देशातील 'या' राज्यांत सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस

CoronaVaccineUpdate : यूपी, बिहार, एमपीसह देशातील 'या' राज्यांत सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस

नवी  दिल्ली - केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांसाठीच लसीकरणाची घोषणा केली आहे. यानंतर अनेक राज्यांनी सर्वांनाच मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घतेला आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर, सर्वप्रथम उत्तर प्रदेशने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला. यानंतर मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड आदी राज्यांनीही मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. (People will get free corona vaccine in these states including Uttar Pradesh Madhya pradesh Bihar kerala and assam)

आता केरल सरकारनेही म्हटले आहे, की ते आपल्या राज्यातील लोकांना मोफत कोरोना लस देणार आहेत. मुख्यमंत्री पिनरई विजयन बुधवारी सायंकाळी म्हणाले, की त्यांचे सरकार 18 वर्षांवरील सर्व लोकांना मोफत कोरोना लस देईल. विजयन म्हणाले, राज्य सरकारांना लस खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, कोरोनामुळे राज्यांवर आधीच मोठा आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे राज्यांना आर्थिक संकटाकडे लोटण्याऐवजी केंद्र सरकारने त्यांना मोफत कोरोना लस पुरवावी.

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

मोफत लशीसंदर्भात काय म्हणाले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री?
उत्तर प्रदेशात मोफत कोरोना लस देण्याची घोषणा करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, राज्य सरकार आपल्याकडे असलेल्या साधनांचा वापर करून लसीकरण कार्यक्रम पुढे नेईल. लसीकरण अभियान व्यापक स्थरावर चालविण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. आपल्याला लसीकरण केंद्र वाढवावे लागतील. यावेळी त्यांनी लशींसाठी कोल्ड चेनसह सुरक्षित साठवणूक आणि परिवहनासाठीही व्यवस्था करण्यावर भर दिला. 

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

बिहारमध्ये आधीपासूनच मिळतेय मोफत लस -
बिहारमध्ये आधीपासून कोरोना लसीकरण मोफत सुरू आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच एनडीएने सत्तेत आल्यास मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यानंतर, सत्तेत येताच कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत मोफत कोरोना लस देण्यावर शिक्का मोर्तब करण्यात आले होते. तेव्हापासूनच राज्यात सर्वांना मोफत कोरोना लस दिली जात आहे. विशेष म्हणजे येथे खासगी रुग्णालयांतही मोफत कोरोना लस दिली जात आहे. बुधवारी स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करत सर्वांना मोफत कोरोना लस देण्यासंदर्भात भाष्य केले आहे. 

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

मोफत लशीसंदर्भात काय म्हणाले आसाम सरकार?
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा बुधवारी म्हणाले, राज्य सरकार 1 मेपासून 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या लोकांचे मोफत लसिकरण करेल. ते म्हणाले, गेल्या वर्षी कोविड-19चा सामना करण्यासाठी मिळालेल्या मदत निधीचा वापर, या कामासाठी करण्यात येईल. राज्य सरकारने आधीच भारत बायोटेकला लशीच्या एक कोटी डोससाठी पत्र लहिले आहे. सरमा यांनी मंगळवारी रात्री उशिरा ट्विट केले, की ''आसाम 18 ते 45 दरम्यानच्या सर्वांनाच मोफत कोरोना लस देईल. भारत सरकार 45 वर्षांवरील नागरिकांना आधीच मोफत लस देत आहे.

English summary :
CoronaVaccineUpdate People will get free corona vaccine in these states including Uttar Pradesh Madhya pradesh Bihar kerala and assam

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVaccineUpdate People will get free corona vaccine in these states including Uttar Pradesh Madhya pradesh Bihar kerala and assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.