शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देशात कोरोनाचा प्रचंड वेग! तीन दिवसांत 1 लाख रुग्ण; एकूण आकडा 9 लाख पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 21:49 IST

देशात 30 जानेवारीला पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर 110 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी ही संख्या वाढून 1 लाख झाली होती. यानंतर 20 मे पासून लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर हा वेग एवढा वाढला की 15 दिवसांत 2 लाखांचा आकडा पार झाला.

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाने प्रचंड वेग घेतला असून केवळ तीन दिवसांत 1 लाखाचा टप्पा ओलांडल्याने खळबळ उडाली आहे. याबरोबरच आज एकूण आकड्याने 9 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर आजपर्यंत एकूण 5 लाख रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच एकूण कोरोनाबाधितांच्या 62 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. 

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आता अमेरिकेनंतर भारतात दिवसाला सर्वाधिक रुग्ण सापडू लागले आहेत. याआधी अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत होते. अमेरिकेत सध्या सरासरी 40000 कोरोना बाधित दररोज सापडत आहेत. तर भारतात सरासरी 25000 नवे रुग्ण सापडत आहेत. 

भारताची आकडेवारी चिंताजनकदेशात 30 जानेवारीला पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर 110 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी ही संख्या वाढून 1 लाख झाली होती. यानंतर 20 मे पासून लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर हा वेग एवढा वाढला की 15 दिवसांत 2 लाखांचा आकडा पार झाला. तीन लाख होण्यासाठी 10 दिवस लागले. 4 लाखांवर आकडा जाण्यासाठी 8 दिवस लागले. तर पाच लाखांवर हा आकडा जाण्यासाठी 6 दिवस लागले. एवढेच दिवस 6 व 7 लाखांवर जाण्यासाठी लागले. 7 वरून 8 लाखांवर आकडा जाण्यासाठी 4 दिवस लागले. तर नंतरचा 9 लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी केवळ 3 दिवस लागले आहेत. 10 लाख लोकसंख्याचा मागे रुग्ण वाढण्याचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतात हे प्रमाण 637 रुग्ण आहे. तर 17 जणांचा मृत्यू होत आहे. तर अमेरिकेत 10312 आणि ब्राझीलमध्ये 8,778 रुग्ण वाढत आहेत. 

तीन राज्यांतच 58% रुग्णमहाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये कोरोनाने कहर केला आहे. या तीन राज्यांत देशाच्या एकूण आकडेवारीच्या 58 टक्के रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात 29.93%, तामिळनाडूमध्ये 15.86 आणि दिल्लीमध्ये 12.94% रुग्ण सापडले आहेत. जगातील 215 देश आणि बेटांपैकी 202 देश असे आहेत की तिथे महाराष्ट्रापेक्षाही कमी रुग्ण सापडले आहेत. तर केवळ 13 देश असे आहेत जिथे महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

राफेलने तुर्कस्तानच्या हवाई तळावर चढविला हल्ला; अनेक लढाऊ विमाने नष्ट

कमाईची मोठी संधी! Yes Bank निम्म्या दराने शेअर विकणार

Rajasthan Political Crisis: गेहलोत बहुमतात, तरीही आमदार अज्ञातस्थळी? भाजपकडून फ्लोअर टेस्टची मागणी

OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही

सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही

अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmericaअमेरिका