शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोना वॉरियर्स... शांत झोप लागण्यासाठी चांगली गादी अन् ८ तास खरंच गरजेचं असतात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 11:34 IST

कोरोना विषाणूंच्या संसर्गाने भारत आणि संपूर्ण जगभरात थैमान घातले असून, देशात शनिवारी या आजाराच्या रुग्णांची संख्या 25 हजारांच्या घरात गेली आहेत.

मुंबई - कोरोनाविरुद्ध गेल्या २ महिन्यांपासून भारतीयांची लढाई सुरु असून १ महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांसाठी काही वेळेची सवलत नागरिकांना देण्यात आली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशातील प्रत्येक नागरिक आपलं योगदान दे आहे. मात्र, डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी आणि पोलीस प्रशासना रात्रंदिवस राबताना दिसत आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक ताण पोलिसांवर पडला आहे. अरुणाचल प्रदेशच्या पोलीस उप महानिरीक्षकांनी एक फोटो शेअर करत, देशातील पोलिसांच्या योगदानबद्दल एका ओळीत सगळंच सांगतिलंय. 

कोरोना विषाणूंच्या संसर्गाने भारत आणि संपूर्ण जगभरात थैमान घातले असून, देशात शनिवारी या आजाराच्या रुग्णांची संख्या 25 हजारांच्या घरात गेली आहेत. जगात कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा २ लाखांपर्यंत गेला आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा २६ हजार २६७ वर गेला असून, त्यापैकी ७ हजारांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही रुग्णांची संख्या प्रत्येकी २ हजारांच्या वर गेला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ८२५ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे हॉटस्पॉट असलेल्या आणि कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असलेल्या भागात ३ मे नंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या २७ मे रोजी सर्वच राज्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये याबाबतीच चर्चा होईल. लॉकडाऊन होणार की नाही, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच, पोलीस प्रशासनाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. कुटुंबापासून दूर रहावे लागत असून रात्रं-दिवस आपल्या कर्तव्यावर जावे लागत आहे. कोरोनामुळे सर्वकाही  बंद आहे. तरीही, मिळेत ते खाऊन आपली ड्युटी पोलीस यंत्रणा करत आहे. त्यातच, कोरोनाग्रस्तांची वाढलेली संख्या ही पोलीस कुटुंबीयांच्या काळजीचा विषय बनला आहे. मात्र, ड्युटी फर्स्ट म्हणत कोरोनाच्या लढाईत देशातील पोलीस यंत्रणा आपलं योगदान देत आहे. 

अरुणाचल प्रदेशचे पोलीस उप-महानिरीक्षक मधुर वर्मा यांनी रात्री चक्क रस्त्यावरच झोपलेल्या पोलिसांचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, दोन पोलीस हवालदार चक्क जमिनीवरच झोपल्याचे दिसून येते. “चांगला बेड आणि आठ तासाची झोप ही काय चैनीच्या गोष्टी आहेत का? हो आहेत जर तुम्ही पोलीस असाल तर… अभिमान आहे मला यांचा”, या कॅप्शनसहीत वर्मा यांनी हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी करोना योद्धे हा हॅशटॅगही ट्विटरवर वापरला आहे. वर्मा यांनी शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.   

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडियाdoctorडॉक्टर