भयंकर! टोमण्यांना कंटाळून कोरोना वॉरियरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 03:51 PM2020-11-02T15:51:10+5:302020-11-02T16:00:56+5:30

Corona Warrior Commits Suicide : टोमण्यांना कंटाळून एका कोरोना वॉरियरने टोकाचं पाऊल उचललं आहे.

corona warrier commits suicide due to taunting people in indore | भयंकर! टोमण्यांना कंटाळून कोरोना वॉरियरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं...

भयंकर! टोमण्यांना कंटाळून कोरोना वॉरियरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं...

googlenewsNext

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामन करत आहे. कोरोनाच्या संकटात लोकांच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कुटुंबीयांपासून दूर राहून अनेकजण मदतीचा हात देत आहे. महामारीच्या काळात कोरोना वॉरिअर सदैव तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टोमण्यांना कंटाळून एका कोरोना वॉरियरने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून आयुष्य संपवलं आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे लोकांच्या टीकेला आणि टोमण्यांना कंटाळून कोरोना वॉरियरने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. सुसाईड नोटमधून हा खुलासा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी तो पाठवण्यात आला. तपासात पोलिसांना या कर्मचाऱ्याजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, "कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यान बरीच सेवा केली. लोकांची मदत केली. मात्र अनेक लोकांनी तुच्छ लेखलं आणि टोमणे आणि टीकेचाही सामना करावा लागला. जे दुसऱ्याला खालच्या पातळीचे समजतात त्यांना देव सुखी ठेवो"असं कोरोना वॉरियरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वॉरियरची नैराश्येत होता आणि त्यातून धक्कादायक पाऊल उचललं आहे. लॉकडाऊनमध्ये केलेल्या मेहनतीचं फळ मिळालं नाही उलट लोकांच्या टीकांचा सामना करावा लागला. म्हणूनच त्याने आत्महत्या केली. तरुण रात्री 2 वाजेपर्यंत एका मित्रासोबत बोलल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहिती आणि सुसाईड नोटवरून तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: corona warrier commits suicide due to taunting people in indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.