ड्रायव्हिंग लायसन्स, PUCची मुदत संपली तरी घाबरू नका; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 06:01 PM2020-06-09T18:01:08+5:302020-06-09T18:09:46+5:30

केंद्रीय मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तीच मुदतवाढ आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

corona virus validity of motor vehicle documents further extended till 30 sept | ड्रायव्हिंग लायसन्स, PUCची मुदत संपली तरी घाबरू नका; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा 

ड्रायव्हिंग लायसन्स, PUCची मुदत संपली तरी घाबरू नका; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा 

Next

नवी दिल्लीः मोटार वाहन कागदपत्रांची वैधता म्हणजेच मुदत संपली असल्यास घाबरू नका, ती मुदत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. केंद्रीय मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तीच मुदतवाढ आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे किंवा देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचं नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत. अशांसाठी हा आदेश देण्यात आलेला आहे.

पूर्वी मंत्रालयाने जाहीर केलेली मुदत 30 जून होती. मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटाची परिस्थिती अद्यापही कायम आहे. त्यामुळे ही मुदत वाढवण्यात येत असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. 1 फेब्रुवारीनंतर प्रलंबित असलेल्या कागदपत्रांच्या वैधतेमध्ये होणा-या दिरंगाईसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा उशीरा फी आकारली जाणार नाही. वाहन चालक आणि नागरिकांची अडचण लक्षात घेता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं हे आदेश दिले आहेत. 31 जुलै 2020 पर्यंत शुल्क भरण्यास विलंब झाल्यास कोणतेही अतिरिक्त किंवा उशिरा शुल्क आकारले जाणार नाही. तत्पूर्वी देशातील ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, PUCसारख्या कागदपत्रांची मुदत १ फेब्रुवारी ते ३० जूनच्या कालावधीत संपत आहे, त्यांची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे या कागदपत्रांचे नूतनीकरण करणं अशक्य असल्याचंही सांगण्यात येत होते. मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि  मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार ही मुदत वाढविण्यात आली आहे. 

कोणतेही वाहन चालविताना चार कागदपत्रे अत्यंत आवश्यक असतात. ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र, इन्शुरन्स आणि पीयूसी असणे आवश्यक असते. ओरिजनल कागदपत्रे सोबत ठेवता येत नसली तरीही त्यांच्या प्रिंट कॉपीबरोबर ठेवू शकतो. तसेच डिजिलॉकर आणि एम परिवहन सारख्या ऍपवरही त्या कॉपी अपलोड करून ठेवता येतात. 

Read in English

Web Title: corona virus validity of motor vehicle documents further extended till 30 sept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.