शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेसारखी धोकादायक ठरू शकते - SBI रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 18:31 IST

Corona Virus : तिसऱ्या या लाटेचा परिणाम सुमारे 98 दिवस म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

ठळक मुद्दे इतर मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सरासरी 108 दिवस आणि तिसरी लाट 98 दिवसांपर्यंत राहू शकते, असेही रिपोर्ट म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या धोकादायक लाटेनंतर आता तिसर्‍या लाटेबाबतही विविध चर्चा सुरू आहे. तसेच, कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI Report) दिलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, तिसरी लाट दुसर्‍या लाटेप्रमाणे प्राणघातक ठरू शकते. तिसऱ्या या लाटेचा परिणाम सुमारे 98 दिवस म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (third covid wave could be as severe as second, SBI report)

आंतरराष्ट्रीय अनुभवांचा संदर्भ देताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या Ecowrap रिपोर्टने मूल्यांकन केले आहे की, चांगल्या तयारीमुळे महामारीच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच, इतर मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सरासरी 108 दिवस आणि तिसरी लाट 98 दिवसांपर्यंत राहू शकते, असेही रिपोर्ट म्हटले आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरूस्टेट बँक ऑफ इंडियाचा हा रिपोर्ट अशा वेळी आला आहे की, देश तिसऱ्या लाटेच्या तयारीत व्यस्त आहे. कोरोना लसीकरणाची गती वाढविण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वैद्यकीय उपकरणेही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत. दुसर्‍या लाटेचा परिणाम पाहता केवळ एका महिन्यात 90.3 लाख कोरोना प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बहुतेक सर्व बाधित राज्यांमधील कोरोना परिस्थिती सुधारली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे.

'लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी दुप्पट तयारी'एकीकडे आता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता तज्ज्ञांकडून तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम लहान मुलांवर जाणवू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, लहान मुलांचे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी दुपटीपेक्षाही अधिक तयारी करण्यात आल्याचे सांगत सरकारने आश्वासन दिले आहे. लहान मुलांमध्ये सर्वाधिक लक्षणे नसलेल्या केसेस आहेत. तर दुसरीकडे गंभीर केसेस कमी आहेत. कोरोना विषाणूने आपले रूप बदलले तर लहान मुलांसाठी धोका वाढू शकतो, असं मत नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल यांनी व्यक्त केले. लहान मुलांच्या रक्षणासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या असतील त्या केल्याच जातील. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. त्यामुळे २ ते ३ टक्के मुलांनाच रुग्णालयाची गरज भासते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतSBIएसबीआयHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस