शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

Corona Virus: १२ वर्षापूर्वीची भविष्यवाणी खरी ठरणार; कोरोना व्हायरसचं संकट अचानक टळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 12:01 PM

Corona Virus: सोशल मीडियावर या पुस्तकावरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत

ठळक मुद्देअमेरिकन लेखिका सिल्व्हिया ब्राउनी यांनी लिहिलं होतं पुस्तक जुलै २००८ मध्ये "End Of Days" नावाचं पुस्तक प्रकाशित कोरोना व्हायरसच्या आजाराबद्दल आधीच केली होती भविष्यवाणी

नवी दिल्ली - चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस आता जगातील अन्य देशात पसरलेला आहे. आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांचा जीव या व्हायरसमुळे गेला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे २९ रुग्ण आढळून आले. कोरोनापासून बचावासाठी विविध उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत.  

जगभरातील अनेक देशांसाठी संकट म्हणून ठरलेल्या कोरोना व्हायरसबाबतची भविष्यवाणी यापूर्वीच झाली होती. काही दिवसांपूर्वीच अमेरिकिन लेखक डीन कुट्ज यांच्या पुस्तकाच्या आधारे ४० वर्षापूर्वीच कोरोना व्हायरसच्या धोक्याबाबत दावा केला होता आता आणखी एका अमेरिकेच्या लेखकाचे पुस्तक व्हायरल होत आहे. 

या पुस्तकात लिहिलेल्या बाबी कोरोना व्हायरसच्या संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर या पुस्तकावरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिकन लेखिका सिल्व्हिया ब्राउनी यांनी जुलै २००८ मध्ये "End Of Days" या नावाचं पुस्तक लिहिलं होतं. जगातील ७७ देशांत पसरलेल्या कोरोना व्हायरसची लक्षणं या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींशी समरूप आहेत. 

"End Of Days" यात पुस्तकात एक उल्लेख आढळतो की, २०२० मध्ये निमोनियासारखा गंभीर आजार जगभरात पसरेल. हा आजार फुफुस्स आणि श्वसननलिकेवर परिणाम करणार आहे. यावर कोणतंही उपचार होऊ शकणार नाही. या इशाऱ्यानंतर असं सांगितलं जातं आहे की, अमेरिकन लेखिकेला जगात पसरलेल्या या भयंकर आजाराबद्दल आधीच कल्पना आली होती. 

त्याचसोबत हा आजार अचानक नाहीसा होईल, ज्या वेगात हा व्हायरस पसरला जाईल तितक्याच जलद तो संपेल. परंतु दहा वर्षानंतर हा रोग पुन्हा परत येईल आणि स्वतःच संपून जाईल असंही या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.  

कोण आहेत सिल्व्हिया ब्राउनी?सिल्व्हिया ब्राउनी स्वत: ला मानसशास्त्रज्ञ आणि अध्यात्मिक गुरु म्हणत होती. त्यांनी असा दावा केला होता की त्याच्याकडे अलौकिक शक्ती आहेत. टीव्ही आणि रेडिओवर त्यांचे बरेच कार्यक्रम होत असे. 20 नोव्हेंबर 2013 रोजी त्यांचे निधन झाले. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या भविष्यवाणी करणाऱ्या पुस्तकाचा फायदा विक्रीत होत आहे. सिल्व्हिया ब्राउनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार हे पुस्तक सध्या संपले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

आता 'कोरोना'लाही विम्याचं कवच? कंपन्यांकडून तयारी सुरू

...तर 'अशा' कर्मचाऱ्यांना घरातून काम करु द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची सूचना

'भारताकडे कोरोना व्हायरसवर प्रतिबंधक लस शोधण्याची क्षमता'

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 'ही' भारतीय पद्धत वापरा; इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितले कारण...

टॅग्स :corona virusकोरोनाAmericaअमेरिका