शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पाकिस्तानच्या सैन्यात शिरला कोरोना, 230 सैनिक आयसोलेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 00:25 IST

पाकिस्तानने एकूण 230 सैनिकांना कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये पाठवले आहे. यापैकी 40 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यात पकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते.

ठळक मुद्देसंबंधित 230 सैनिकांपैकी 40 जण पॉझिटिव्ह यात पकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश  पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये आहेत पाकिस्तानचे क्वारंटाइन सेंटर्स 

नवी दिल्ली - चीनसोबतची खुली सीमा आणि मोठ्या प्रमाणावर चीनी नागरिकांशी संपर्क, याचा परिणाम आता पाकिस्तानात स्पष्टपणे जाणवू लागला आहे. पाकिस्तानात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आता पाकिस्तानी लष्करातही कोरोनाने शिरकाव केला आहे. 

पाकिस्तानने एकूण 230 सैनिकांना कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये पाठवले आहे. यापैकी 40 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यात पकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते.

संबंधित संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, गिलगिट- बाल्टिस्तानमध्ये 28, डोमेलमध्ये 41, बागमध्ये 9, रावलाकोटमध्ये 14, मीरपूरमध्ये 45 आणि खैबर पख्तुनख्वामध्ये 55 पाकिस्तानी सैनिकांना क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे. तर मुझफ्फराबादमध्ये 21, रावलाकोटमध्ये 9, कोटलीमध्ये 2, बलुचिस्तानमध्ये 8, तसेच खैबर पख्तुनख्वा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक सैनिक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 

पाकिस्तानने आपल्या पंजाबसारख्या महत्वाच्या प्रांतांमध्ये कोरोना पसरू नये यासाठी, पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये क्वारंटाइन सेंटर्स  स्थापन केले आहेत. तसेच या भागांचे संपूर्ण नियंत्रण सैन्याकडे असल्याने येथील बातम्या बाहेरही जाऊ नयेत, असाही यामागचा उद्देश असू शकतो.

उपचारावेळी तरुण डॉक्टरचा मृत्यू -पाकिस्तानात कोरोनामुळे आतापर्यंत 7 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात गिलगिट- बाल्टिस्तानमधील एका तरुण डॉक्टरचाही समावेश आहे. डॉ. उसमा रियाज, असे या 26 वर्षीय डॉक्टरचे नाव आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची तपासणी करताना त्याच्याकडे मास्क आणि ग्लोव्हज नव्हते. यामुळे त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता.

1.13 ट्रिलियनचे आर्थिक पॅकेज जाहीरकोरोना व्हायरसच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने मंगळवारी तब्बल 1.13  ट्रिलियन (1 लाख 13 हजार कोटी) रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. कोरोनाविरुद्ध लढा आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी इमरान खान यांनी या निधीची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानcorona virusकोरोना वायरस बातम्याSoldierसैनिकIslamइस्लामPOK - pak occupied kashmirपीओकेImran Khanइम्रान खान