शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Updates: महाराष्ट्रातच नव्हे, तर आता संपूर्ण देशात वाढतोय कोरोना; नवी आकडेवारी चिंता वाढवणारी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 17:11 IST

Corona Virus Updates: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत असल्यानं राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे.

Corona Virus Updates: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत असल्यानं राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. पण आता इतर राज्यांमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्रानंतर आता इतर राज्यांमध्येही कोरोना भयंकर रुप धारण करत असल्याचं नव्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.  (corona virus cases in india lockdown night curfew delhi lucknow maharashtra up bihar updates)

"राज्यात १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, पण परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नये", हसन मुश्रीफांचे आवाहन

देशात सोमवारी १ कोटी ६० लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता १२ लाखांच्या वर पोहोचली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी महाराष्ट्रात निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असले तरी आता दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत जात आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास केंद्र सरकारसमोरील अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 

राज्यात लॉकडाऊनची शक्यता, कोरोनाची गंभीर परिस्थिती; राज्यपालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊवर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. एकट्या लखनऊमध्ये दिवसागणिक ४ हजार रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवरही ताण वाढत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स अपुरे पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. 

दुसरीकडे उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत तब्बल १८ हजार २१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. एका दिवसातील रुग्ण वाढीचा उत्तर प्रदेशचा हा सर्वाधिक आकडा नोंदवला गेला आहे. तसंच गेल्या २४ तासांत राज्यात ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये नाइट कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे. 

अमरावती पॅटर्न वापरणार, ठाकरे सरकार कोरोनाला रोखणार; नेमका काय आहे हा पॅटर्न जाणून घ्या...

देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसतंय. दिल्लीत सोमवारी ११ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळलेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीतही नाइट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यासोबत इतरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या ३८ हजारापेक्षा जास्त झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता पडत आहे. यामुळेच दिल्ली सरकारनं १४ खासगी रुग्णालयांना पूर्णत: कोविड रुग्णांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाचं संकट असतानाही कुंभ मेळ्याचं आयोजन केल्याच्या मुद्द्यावर उत्तराखंड सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. उत्तराखंडमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. उत्तराखंडमध्ये नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये तर लॉकडाऊन जाहीर देखील करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात गेल्या २४ तासांत ६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे भोपाळमध्ये १९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर संपूर्ण राज्यात याआधीच नाइट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. याशिवाय छिंदवाडा, ग्वालियार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 

गुजरातच्या अहमदाबादमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात तर कोरोना रुग्णांचे बेड्स उपलब्ध नसल्यानं हाल होत आहेत. या रुग्णालयात सध्या १२०० बेड्स रुग्णांनी भरले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयाबाहेर अॅम्ब्युलन्समध्येच ठेवण्याची वेळ आली आहे. अॅम्ब्युलन्समध्ये रुग्णांना ऑक्सिजन देण्याची वेळ ओढावली आहे. 

देशातील कोरोनाची परिस्थितीएकूण रुग्ण:  1,36,89,453 बरे झालेले रुग्ण: 1,22,53,697 देशात सध्या सक्रिय रुग्ण: 12,64,698 आतापर्यंत झालेले मृत्यू: 1,71,058आतापर्यंत झालेलं लसीकरणाचे एकूण डोस: 10,85,33,085 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत