शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Breaking on Coronavirus Vaccine: कोविडचे विघ्न सरणार; पुण्यात दोन स्वयंसेवकांनी घेतला 'कोव्हिशिल्ड' लसीचा पहिला डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 17:09 IST

देशातील पहिलीच मानवी चाचणी..

ठळक मुद्देसिरम इन्स्टिट्यूटतर्फे भारती हॉस्पिटलमध्ये लसीच्या मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात

पुणे : सिरम इन्स्टिट्यूटतर्फे भारती हॉस्पिटलमध्ये लसीच्या मानवी चाचणीच्या दुस-्या टप्प्यास सुरुवात झाली. यासाठी सुरुवातीला पाच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी तिघांच्या अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने इतर दोन जणांना लस देण्यात आली. त्यापैकी एक स्वयंसेवक ३२ वर्षीय पुरुष असून, दुसरी व्यक्ती ४७ वर्षीय पुरुष आहे. लस दिल्यानंतर अर्धा तास निरिक्षण करून घरी सोडण्यात आले. दोन्ही स्वयंसेवकांना ०.५ एमएलचा डोस देण्यात आला.

२८ दिवसांनी स्वयंसेवकांना दुसरा डोस दिला जाणार आहे. ९० दिवसांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला जाईल आणि १८० दिवसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावले जाईल. सहा महिन्यांमध्ये लसीच्या यशस्वितेवर शिक्कामोर्तब होऊ शकेल. पुढील सात दिवसांमध्ये २५ जणांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. \

सिरम इन्स्टिट्यूटतर्फे लसींच्या उत्पादनासाठी अ‍ॅस्ट्राझेनेका या ब्रिटिश-स्विडिश कंपनीशी करार करण्यात आला आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठातर्फे लस विकसित करण्यात येणार आहे. कोव्हिशिल्ड या लसीची सुरक्षितता, क्षमता यांची चाचणी केली जाणार आहे. ‘केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेतर्फे (सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन) सर्व मान्यता मिळाल्या आहेत. संस्थेकडून ३ ऑगस्ट रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्प्यातील चाचण्यांना मान्यता देण्यात आली. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये चाचणीला सुरुवात झाली.

लसीच्या चाचण्या १७ विविध शहरांमध्ये घेतल्या जाणार आहेत. यामध्ये एम्स दिल्ली, पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेज, पटणा येथील राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्यकेशन अँड रिसर्च, एम्स जोधपूर, गोरखपूरमधील नेहरु हॉस्पिटल, विशाखापट्टणम येथील आंध्र मेडिकल कॉलेज, म्हैसूरमधील जेएसएस अ‍ॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च आदींचा समावेश आहे.

-----------कोरोनावरील लसीची मानवी चाचणी भारती विद्यापिठात होणार असल्याचे सोशल मीडियातून समजले. मी हॉस्पिटलशी संपर्क साधला आणि नावनोंदणी केली. हॉस्पिटलमध्ये आल्यावर सर्व प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. आरटीपीसीआर आणि अँटिबॉडी टेस्ट झाल्यानंतर लसीच्या मानवी चाचणीसाठी मी पात्र असल्याचे समजल्यावर आनंद झाला. समाजासाठी मी काहीतरी करू शकतो आहे याचे समाधान वाटते आहे आणि माझे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत...या भावना आहेत ३२ वर्षीय स्वयंसेवकाच्या...अवघ्या जगावर कोरोनाचे संकट कोसळले असताना संकटातून मार्ग काढण्यात आपल्याला खारीचा वाटा उचलता येत असल्याचे समाधान त्याच्या चेह ऱ्यावरून व्यक्त होत होते.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्य