CoronaVirus: देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के, गेल्या २४ तासांत ३७५४ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:06+5:302021-05-11T06:10:23+5:30

सध्या ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्णांवर उपचार सुरू असून हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १६.५३ टक्के आहे. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३९ टक्के आहे...

Corona virus: 83% patient cure in the country, 3754 deaths in the last 24 hours | CoronaVirus: देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के, गेल्या २४ तासांत ३७५४ जणांचा मृत्यू 

CoronaVirus: देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के, गेल्या २४ तासांत ३७५४ जणांचा मृत्यू 

Next

नवी दिल्ली : देशात सलग चार दिवस चार लाखांच्या वर कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात तीन लाख ६६ हजार १६१ नव्या रुग्णांची भर पडली. या २४ तासात ३७५४ जणांचा मृत्यू झाला, तर एकूण मृत्यूची संख्या २,४६,११६ झाली. देशात आता एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

सध्या ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्णांवर उपचार सुरू असून हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १६.५३ टक्के आहे. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३९ टक्के आहे. देशात आतापर्यंत एक कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ रुग्ण बरे झाले असून मृत्यू दर १.०९ टक्के आहे. देशात गेल्यावर्षी सात ऑगस्ट रोजी २० लाख कोरोना रुग्ण होते, तर या महिन्यात चार तारखेला रुग्णांचा दोन कोटींचा आकडा ओलांडला गेला होता. रविवारी १४ लाख ७४ हजार ६०६ नमुन्यांची तपासणी केली गेली, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले.
 

Web Title: Corona virus: 83% patient cure in the country, 3754 deaths in the last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.