Corona Vaccine : कोरोना लसीचा धसका! लसीकरणासाठी नर्स घरी येताच महिला घरातून पळाली अन्...; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 05:07 PM2021-09-25T17:07:20+5:302021-09-25T17:15:04+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: एका महिलेने कोरोना लसीचा धसका घेतला आणि लसीकरणासाठी नर्स घरी येताच महिला घरातून पळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Corona Vaccine woman kept running away considering the vaccine as the cause of death | Corona Vaccine : कोरोना लसीचा धसका! लसीकरणासाठी नर्स घरी येताच महिला घरातून पळाली अन्...; Video व्हायरल

Corona Vaccine : कोरोना लसीचा धसका! लसीकरणासाठी नर्स घरी येताच महिला घरातून पळाली अन्...; Video व्हायरल

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 29,616 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 290 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,46,658 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी लस घेतली आहे. मात्र अद्यापही काही लोकांच्या मनात लसीबाबत भीतीचे वातावरण आहे. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. एका महिलेने कोरोना लसीचा धसका घेतला आणि लसीकरणासाठी नर्स घरी येताच महिला घरातून पळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील धरियावदमध्ये 'कोरोना लस घेतल्यावर मी मरून जाईन' असं लसीकरणाच्या भीतीने महिला जोरजोरात ओरडली आणि घरातून पळून गेली असं म्हटलं आहे. महिला लस घेण्यास घाबरत असल्याने तिच्या कुटुंबियांनी घरीच नर्सला बोलावलं होतं. नर्सला पाहून महिला घरातून पळाली. तिला पकडण्यासाठी नातेवाईक आणि गावातील काही लोक तिच्या मागे धावू लागले, अखेर ते महिलेला पकडण्यात यशस्वी ठरले. या वेळी महिलेला लसीकरणाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. खूप समजावलं पण ती ऐकून घेण्यास तयारच नव्हती. 

'कोरोना लस घेतल्यावर मी मरून जाईन', लसीकरणाच्या भीतीने 'ती' जोरात ओरडली

महिलेला पकडून शेवटी लस देण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये महिलेच्या मागे लोक धावताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मन्ना गायरी असं या महिलेचं नाव असून तिच्या मनात कोरोना आणि लसीबाबत खूप जास्त भीती होती. लस घेताच आपला मृत्यू होईल असं तिला वाटत होतं. महिलेचा पती आणि कुटुंबीयांनी लस घेतली आहे पण तरी देखील ती घेण्यास तयार नव्हती. नातेवाईकांनी तिला खूप समजावलं पण ती कोणाच ऐकत नव्हती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सणासुदीच्या काळात निष्काळजीपणा ठरेल घातक, कोरोनाचा धोका; केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी

सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे. सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहितीही याआधी समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. सणसमारंभाच्या काळात पुढील तीन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्क्यापेक्षा अधिक आहेत तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर 5 टक्क्यापेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणं गरजेचं असेल. रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जातील.

Web Title: Corona Vaccine woman kept running away considering the vaccine as the cause of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.