Corona Vaccine: जूनमध्ये 9 ते 10 कोटी कोव्हिशिल्ड डोस देणार; सीरमचा अमित शहांना शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 20:18 IST2021-05-30T20:18:19+5:302021-05-30T20:18:53+5:30

Serum Institute Wrote letter to HM Amit Shah: देशात सध्या दोन कंपन्यांच्या लस उपलब्ध आहेत. रशियाची तिसरी लस स्पुतनिक व्ही ही देखील या आठवड्यापासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. कोरोना लसीकरणाचा 18 ते 44 वयोगटाचा टप्पा जाहीर केल्यानंतर कोरोना लसीची मोठी टंचाई झाली होती.

Corona Vaccine: Serum Institute promises 9-10 crore Covishield doses in June; wrote letter to Amit Shah | Corona Vaccine: जूनमध्ये 9 ते 10 कोटी कोव्हिशिल्ड डोस देणार; सीरमचा अमित शहांना शब्द

Corona Vaccine: जूनमध्ये 9 ते 10 कोटी कोव्हिशिल्ड डोस देणार; सीरमचा अमित शहांना शब्द

देशात मे महिन्यात कोरोना लसीच्या भीषण तुटवडा जाणवला होता. मात्र, जूनमध्ये एकटी सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute ) 9 ते 10 कोटी कोव्हिशिल्डचे डोस देणार असल्याने लसीकरण मोहिमेला (Corona Vaccination Drive) मोठा दिलासा मिळण्याबरोबरच वेगही मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Serum Institute of India (SII) has informed the government that it will be able to manufacture and supply nine to 10 crore doses of Covishield in June)


देशात सध्या दोन कंपन्यांच्या लस उपलब्ध आहेत. रशियाची तिसरी लस स्पुतनिक व्ही ही देखील या आठवड्यापासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. कोरोना लसीकरणाचा 18 ते 44 वयोगटाचा टप्पा जाहीर केल्यानंतर कोरोना लसीची मोठी टंचाई झाली होती. केंद्राने सारा साठा बुक केल्याने आणि राज्यांवर 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाची जबाबदारी टाकल्याने कंपन्यांनीदेखील हात वर केले होते. यामुळे राज्यांना या वयोगटासाठी लस मिळालेली नाहीय. जी मिळाली ती देखील तुटपुंजी होती. यामुळे केंद्र आणि राज्यांमध्ये वाद झाले होते. तसेच सीरमच्या एका उच्च पदस्थानेदेखील मोदी सरकारच्या या धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते. 


सीरम जूनमध्ये 9 ते 10 कोटी लसी पुरविणार आहे. अधिकृत सुत्रांनी याची माहिती दिली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना सीरमने पत्र लिहिले होते. यामध्ये कोरोना महामारीच्या संकटात आमचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. सीरमचे सरकारी आणि नियामक बाबींचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी हे पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी सीरम जूनमध्ये कोव्हिशिल्ड लसीचे 9 ते 10 कोटी डोस पुरविणार आहे. मे मध्ये आम्ही 6.5 कोटी डोस उत्पादित केले आहेत, त्यापेक्षा ही संख्या खूप जास्त आहे, असे म्हटले आहे. 


आम्ही तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, भारत सरकारच्या पाठिंब्याने आणि तुमच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही येणाऱ्या महिन्यांत कोरोना लसीचे उत्पादन वाढविणे आणि आमच्या उपलब्ध यंत्रणेचा सर्वोत्तम वापर करण्याचा प्रयत्न करू, असे पुढे या पत्रात म्हटले आहे. (SII writes to Home Minister Amit Shah saying its employees have been working round the clock to meet targets)

Web Title: Corona Vaccine: Serum Institute promises 9-10 crore Covishield doses in June; wrote letter to Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.