शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

corona vaccine : भारतातील खासगी रुग्णालयांना ६०० रुपये दराने मिळणार कोविशिल्ड, सिरमनं दिलं असं स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 5:22 PM

Corona vaccination Update : कोविशिल्ड लसीसाठी जाहीर केलेल्या दरांवरून सिरम इन्स्टिट्युटवर टीका झाली होती. त्यानंतर आता सिरमकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

पुणे - कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केल्यापासून देशभरात कोरोनाविरोधातील लसीची मागणी वाढली आहे. (Corona vaccination in India) त्यामुळे देशातील लसीकरणाच्या मोहिमेवर मोठा ताण आला आहे. त्यातच १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. दरम्यान, देशात कोविशिल्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटने देशांतर्गत वितरणासाठी लसीचे दर जाहीर केले होते. त्यात केंद्र सरकारला १५०, राज्य सरकारांना ४०० आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपये दराने लस देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, या दरांवरून सिरम इन्स्टिट्युटवर टीका झाली आहे. त्यानंतर आता सिरमकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Only a limited portion of Serum Institute of India's volume will be sold to private hospitals at INR 600 per dose,  The explanation given by serum institute)

याबाबत सिरम इन्स्टिट्युटकडून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सिरम इन्स्टिट्युट उत्पादित होणाऱ्या लसींमधील मोजका साठाच खाजगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रत्येकी दराने विक्री करणार आहे. ही रक्कम कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी अन्य औषधे आणि साहित्याच्या मनाने फार कमी आहे, असेही सिरमने म्हटले आहे. 

दरम्यान, सीरमची (Serum Institute of India ) लस भारतातच (India) सगळ्यात महाग असल्याची माहिती समोर आली होती. लसीच्या किंमतीवरुन सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे.केंद्रानं लसींच्या किंमतीवरील भ्रम दूर करत दोन्ही लसींसाठी १५० रुपयेच देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी यासंदर्भातील एक स्पष्टीकरण दिलं. केंद्र सरकार १५० रूपयांतच या लसी खरेदी करणार असून राज्यांना त्या मोफत दिल्या जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. "दोन्ही लसींच्या खरेदीसाठी भारत सरकारची किंमत १५० रूपये प्रति डोसच आहे. भारत सरकारद्वारे खरेदी करण्यात आलेली लस राज्यांना मोफतच दिली जात राहिल," असं आरोग्य मंत्रालयानं ट्वीट करत म्हटलं आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतHealthआरोग्य