Corona vaccine: तिसऱ्या टप्प्याची तयारी किती?; जाणून घ्या काय आहे लसीकरण मोहिमेचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 06:40 IST2021-04-26T00:12:01+5:302021-04-26T06:40:49+5:30
समस्त भारतीय सध्या कोरोना या महासाथीशी लढत आहेत. अधिकाधिक प्रमाणात लस घेतल्यानेच या लढ्याला यश मिळणार आहे. त्यामुळेच १ ...

Corona vaccine: तिसऱ्या टप्प्याची तयारी किती?; जाणून घ्या काय आहे लसीकरण मोहिमेचा प्लॅन
समस्त भारतीय सध्या कोरोना या महासाथीशी लढत आहेत. अधिकाधिक प्रमाणात लस घेतल्यानेच या लढ्याला यश मिळणार आहे. त्यामुळेच १ मेपासून १८ वर्षांपुढील सगळ्यांसाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. लसीकरणाच्या या तिसऱ्या टप्प्याविषयी थोडक्यात...
कोणत्या राज्यांना किती लसी मिळतील
राज्यांना लससाठा देताना त्या राज्यात संसर्गाचे प्रमाण किती आणि लसीकरणाचा वेग कसा, यांचाही आढावा घेतला जाईल
लसींच्या किती मात्रा संबंधित राज्याने वाया घालवल्या आहेत, हा निकषही विचारात घेतला जाईल
लसपुरवठ्यासंदर्भात राज्यनिहाय आढावा घेऊन कोणत्या राज्याला किती लसी मिळतील, हे आधीच कळवले जाईल
आयात केलेल्या लसींचे काय
आयात केलेल्या लसी खुल्या बाजारात विकण्यास केंद्राची परवानगी आहे
यांच्या किमतींवर केंद्राचे नियंत्रण राहणार नाही
आयात लसी बाजारात कधी उपलब्ध होणार, हे अद्याप स्पष्ट नाही
लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्यांचे काय
४५ वर्षांपुढील सर्वांना, ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. लसीची दुसरी मात्रा देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असून त्यांना ती योग्य वेळेत दिली जाणार आहे. त्यासंदर्भातील सर्व सूचना संबंधितांना कळविण्यात येईल.
सीरम : १२ ते १४ कोटी लसमात्रा मे ते जूनदरम्यान उपलब्ध केल्या जाणार आहेत
स्पुटनिक व्ही : ही लस मेअखेरीस भारतात दाखल होणार असून तिच्या किती मात्रा उपलब्ध असतील, याची माहिती अद्याप उघड झालेली नाहीकोव्हॅक्सिन : २ कोटी ९० लाख लसमात्रा खुल्या बाजारात उपलब्ध होणार आहेत
जॉन्सन अँड जॉन्सन : लस भारतात यायला आणखी काही महिन्यांचा अवकाश आहे
फायझर : केवळ केंद्र सरकारला लस पुरवणार आहे. मात्र, उभयतांमध्ये अद्याप करार झालेला नाही