शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

corona vaccine : त्यामुळे देशात जाणवतेय कोरोना लसींची टंचाई, आरटीआयमधून समोर आले धक्कादायक कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 2:23 PM

corona vaccination in India : देशात निर्माण झालेल्या कोरोना लसींच्या टंचाईमागचे धक्कादायक कारण माहितीच्या अधिकारामधून मिळवलेल्या माहितीमधून (आरटीआय) समोर आले आहे.

ठळक मुद्देकोरोना लसींच्या टंचाईमागचे धक्कादायक कारण माहितीच्या अधिकारामधून मिळवलेल्या माहितीमधून ( RTI) आले समोर मोठ्या प्रमाणावर वाया गेलेल्या कोरोना लसी हे लसींची टंचाई निर्माण होण्यामागचे कारण आरटीआयमधील माहितीनुसार ११ एप्रिलपर्यंत देशात कोरोनावरील तब्बल ४५ लाख लसी वाया गेल्या आहेत

नवी दिल्ली - कोरोवा विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. (coronavirus in India) त्यामुळे देशात कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवण्यात येत आहे. (corona vaccination in India) मात्र वाढत्या लसीकरणासोबत देशात कोरोना लसींचा तुटवडाही जाणवत आहे. मात्र देशात निर्माण झालेल्या कोरोना लसींच्या टंचाईमागचे धक्कादायक कारण माहितीच्या अधिकारामधून मिळवलेल्या माहितीमधून ( RTI) समोर आले आहे. (The country is experiencing a shortage of corona vaccines as a large number of corona vaccines are being wasted, Information came out from RTI)

मोठ्या प्रमाणावर वाया गेलेल्या कोरोना लसी हे लसींची टंचाई निर्माण होण्यामागचे कारण असल्याचे आरटीआयमधील माहितीमधून समोर येत आहे. आरटीआयमधील माहितीनुसार ११ एप्रिलपर्यंत देशात कोरोनावरील तब्बल ४५ लाख लसी वाया गेल्या आहेत. लसी वाया घालवण्यामध्ये पाच राज्ये सर्वात पुढे आहेत. विविध राज्यांमध्ये वापरण्यात आलेल्या १०.३४ कोटी डोसांपैकी ४४.७८ लाख डोस वाया गेले, असे आरटीआयमधील रिपोर्टमध्ये म्हटले आहे.    लस वाया घालवणाऱ्यांमध्ये तामिळनाडू आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये ११ एप्रिलपर्यंत १२.१० टक्के लसी वाया गेल्या आहेत. तर हरियाणामध्ये ९.७४ टक्के लसी वाया गेल्या आहेत. त्यानंतर पंजाब (८.१२), मणिपूर (७.८०) आणि तेलंगाणामध्ये ७.५५ टक्के लसी वाया गेल्या आहेत, अशी माहिती आरटीआयमध्ये नमुद करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. 

मात्र देशात काही अशी राज्येही आहेत जिथे कोरोनाच्या लसी वाया गेलेल्या नाही. मिळालेल्या माहितीनुसार केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोराम, गोवा, दमण आणि दिव, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप येथे कोरोनाच्या लसी फार वाया गेलेल्या नाहीत. 

देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला होता. सुरुवातीला आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. आता ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तर १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यRight to Information actमाहिती अधिकार