शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

"कोरोना लस देशातील नागरिकांनाच दिली जाणार मग एक देश आणि तीन किंमती का?"; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 10:11 IST

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे.  कोरोनावर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार आहे तर लसींच्या किंमतीत भेदभाव का? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला आहे.

"केंद्र सरकार भारतातील तीन टक्के लोकसंख्येचंही लसीकरण पूर्ण करू शकलेलं नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारने लस वितरण व्यवस्था आणखीन मजबूतीनं आपल्या हाती घेण्याची गरज होती, मात्र या वेळेस सरकारने आपल्या जबाबदारीतून हात झटकले आणि लस वितरणाची जबाबदारी राज्यांवर ढकलली" असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला आहे. तसेच "केंद्र सरकारने एप्रिलपर्यंत जवळपास 34 कोटी लसींचीच मागणी केली होती. लसीकरणाचा सध्याचा दर लक्षात घेता प्रत्येक दिवशी जवळपास 19 लाख नागरिकांचं लसीकरण पार पडत आहे."

"सरकारकडून डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु, यासाठी प्रत्येक दिवशी 70-80 लाख लसीचे डोस देण्याची कोणतीही योजना सरकारनं देशासमोर ठेवलेली नाही. कोरोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार असेल तर लसींच्या किंमतीत भेदभाव का? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का?" असा शब्दांत प्रियंका यांनी निशाणा साधला आहे. तसेच "लसीच्या वितरणासंबंधी केंद्र सरकार दिशाहीन आहे. केंद्र सरकारच्या दिशाहीन नीतीमुळे अनेक राज्यांना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढावं लागलं."

"आज मॉडर्ना, फायजर यांसारख्या लस कंपन्यांनी राज्यांशी थेट व्यवहार करण्यास नकार देत केंद्राशी चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. ग्लोबल टेंडर काढायला लावून राज्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनण्याची वेळच का आली?" असे अनेक प्रश्न प्रियंका यांनी केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी देखील प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर लसीकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "आता लसीवर फक्त मोदीजींचा फोटो आहे, उर्वरित जबाबदारी राज्यांवर टाकली गेली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे लसीच्या कमतरतेबद्दल माहिती पाठवत आहेत" अशी परिस्थिती असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं.

"भारताच्या 130 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 11% लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि केवळ 3 % टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. मोदीजींच्या लस उत्सवाच्या घोषणेनंतर गेल्या एका महिन्यात लसीकरण 83% घटले. आज मोदी सरकारने देशाला लसीच्या कमतरतेच्या दलदलीत ढकलले आहे. सरकारचे अयशस्वी लस धोरण या लसीच्या कमतरतेमागे असल्याचे दिसून येते. याला जबाबदार कोण?" कोरोनाच्या सुरुवातीपासूनच कोरोना लस सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याच्या साधनाऐवजी पंतप्रधानांच्या वैयक्तिक प्रसिद्धीचे साधन बनले. त्यामुळे जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आज इतर देशांच्या लसीच्या देणग्यांवर अवलंबून आहे. तसेच लसीकरणाच्या बाबतीत जगातील कमकुवत देशांच्या रांगेत सामील झाला आहे" असं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस